आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: प्ले स्कूलमध्ये 2 वर्षीय चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार, पालकांनी घेतली पोलिसांत धाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या एका प्ले स्कूलमध्ये 2 वर्षीय चिमुरड्यावर कथितरीत्या लैंगिक शोषण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, बालकाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. घटना सोमवारची आहे. चिमुरड्याची आई म्हणाली की, जेव्हा त्या त्याला शाळेत घ्यायला गेल्या, तेव्हा तो खूप रडत होता. त्यांनी त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग पाहिले, यानंतर त्यांना काहीतरी अनर्थ झाल्याची खात्री पटली. मग त्या त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. तेथे त्याच्या रेक्टम (गुद्दद्वार) मध्ये दुखापत पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. त्यांनी मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला.

 

शाळेने सहकार्य केले नाही...

दुसऱ्या दिवशी मुलाचे पालक शाळेत आले आणि याची तक्रार प्रिंसिपलना केली. शाळेच्या प्रिंसिपल जयश्री आनंद यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले. यानंतर मुलाच्या पालकांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची मागणी केली, परंतु त्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. शाळेच्या प्रशासनाने त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवायला नकार दिला.

यानंतर शाळेच्या प्रिंसिपलने मुलाच्या पालकांना फोनवर सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेरा काम करत नाहीये. जयश्री आनंद म्हणाल्या की, सीसीटीव्हीमध्ये 26 जूनपासून ते 2 जुलैपर्यंतची कोणतीही रेकॉर्डिंग होऊ शकली नाही. तथापि, यादरम्यान चिमुरड्यावर मात्र लैंगिक अत्याचार झाले होते.

 

पोलिसांत तक्रार दाखल...
यानंतर बालकाच्या आईवडिलांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मागच्या वर्षीही कोलकाताच्या दोन प्रसिद्ध शाळांमध्ये अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनांनी शासनाला हादरवून सोडले होते.

 

बातम्या आणखी आहेत...