आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोदींच्या मतदारसंघात उड्डाणपूल कोसळला, एवढे भीषण आहेत अपघाताचे फोटोज, Under Construction Flyover Collapse In Varanasi Several Feared Trapped

मोदींच्या मतदारसंघात उड्डाणपूल कोसळून 18 जण ठार, एवढे भीषण आहेत अपघाताचे फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - वाराणसीच्या कैंट स्टेशनपासून 100 मीटर अंतरावर मंगळवारी मोठा अपघात झाला. येथे निर्माणाधीन उड्डाणपुलाची एक बीम जमीनदोस्त झाली. या अपघातात 18 जण मृत्युमुखी पडले आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक जण दबलेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बीम तब्बल 200 मीटर लांब आणि 100 टन वजनाचा होता. याप्रकरणी चीफ प्रोजेक्ट मॅनेजरसहित 4 ऑफसर्सना निलंबित करण्यात आले आहे. ज्या जागी हा अपघात झाला तो मोठ्या वर्दळीचा परिसर आहे. वाराणसी हा पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ आहे.

- सीएम योगी आदित्यनाथ यांनी पुल कोसळण्याच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाला वेगाने मदतकार्य करून अपघातग्रस्तांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आदेश दिले.
- सूत्रांनुसार, उड्डाणपुलाचा भाग कोसळून खालून जाणाऱ्या वाहनांवर पडला. या ढिगाऱ्याखाली मिनी बस, दोन कार, मोटरसायकल आणि व्हॅन दबलेल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्ष साक्षीदारांच्या मते, ढिगाऱ्याखाली 50 हून जास्त जण दबलेले आहेत. यामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- घटनास्थळावरून येत असलेल्या फोटोंतून निर्माणाधीन पुलाच्या कोसळलेल्या भागाखाली अनेक वाहने दबलेली दिसू शकतात. स्थानिकही मदतकार्यात गुंतलेले आहेत. घटनास्थळावर प्रशासन आणि मदतकार्य करणारे हजर आहेत.

 

अखिलेश यांचे आवाहन
- माजी सीएम अखिलेश यादव यांनी ट्विट करून लिहिले- 'सरकारला फक्त भरपाई देऊन आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळता येणार नाही, पूर्ण घटनेची प्रामाणिकपणे चौकशी करतील अशी अपेक्षा करतो.'
- सोबतच लिहिले- 'वाराणसीमध्ये पुलाच्या अपघातातून लोकांना वाचवण्यासाठी मी तेथील माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, बचाव पथकाला त्यांनी पूर्ण सहकार्य करावे.'

 

भरपाईची घोषणा
- सीएम योगी यांनी अपघातावर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
- सोबतच अपघाताची चौकशी करणार असल्याचे म्हणत त्यांनी दोषींवर कडक कारवाईचे आश्वासनही दिले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे भयंकर फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...