आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook वर अल्पवयीन तरुणीशी मैत्री, हॉटेलवर बोलावले; मग बेशुद्ध करून केला रेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगाव - सोशल मीडियावर मैत्री करून बलात्कार करण्याचे एक प्रकरण हरियाणात समोर आले आहे. येथे एका युवकाने अल्पवयीन तरुणीशी फेसबूकवर मैत्री केली. यानंतर तिला जेवणासाठी बोलावले. याच ठिकाणी तिच्या जेवणात औषधी टाकून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना शनिवारी घडली असून नुकतेच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आता हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. 


रात्री जेवताच बेशुद्ध पडली पीडिता...
- होशियारपूर येथील युवक जीतेंद्र उर्फ जस्सलने नुकतीच फेसबकूवर एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर त्याने मुलीला जेवणासाठी दिल्लीत मीटिंग फिक्स केली. त्याच दिवशी आरोपीने मुलीला द्वारका येथे बोलावले. यानंतर उत्तम नग स्टेशनवर येण्यास सांगितले. त्यावेळी आरोपीचा मित्र त्याच्या सोबत होता. 
- आरोपीने अगदी हुशारीने तिला दशरथपुरी येथील हॉटेल रुमवर नेले. रुमवर जस्सल त्याचा मित्र आणि ती मुलगी असे तिघेही पोहोचले. आधी या तिघांनी दोन खोल्या बुक केल्या. एकामध्ये जस्सलचा मित्र थांबला. तर दुसऱ्या रुममध्ये जस्सल आणि ती मुलगी गेली. पीडितेने लावलेल्या आरोपानुसार, या ठिकाणी ती जेवताच बेशुद्ध पडली. सकाळी झोपेतून उठली तेव्हा आपल्यासोबत वाइट घडल्याचा भास तिला झाला. या घटनेची माहिती पीडितेने आपल्या कुटुंबियांना दिली आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...