आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Underage Girl Sold By Mother And Raped Disclosed In A Letter To Friend In Haryana

16 वर्षांच्या मुली 3 लाखांत सौदा, आईनेच घडवला मित्राकडून बलात्कार; असा झाला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - हरियाणातील एका 16 वर्षीय मुलीला तिच्या आईने 3 लाख रुपयांच्या बदल्यात विकले. एवढेच नव्हे, तर आपल्या एका पुरुष मित्राकडून पोटच्या मुलीवर बलात्कार देखील घडवला. पीडित मुलीला लिहिता आणि वाचता येत नाही. अशात तिने आपल्या एका मैत्रिणीला आपबिती सांगितली. तिच्याच हातून आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांचे एक पत्र लिहून घेतले. त्या मैत्रिणीने हे पत्र झज्जर पोलिसांना दिले आणि ही धक्कादायक घटना सर्वांसमोर आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या पुरुष मित्राला अटक केली आहे. 


3 लाखांत केला मुलीचा सौदा
- पत्रात अल्पवयीन मुलीने सांगितल्याप्रमाणे, माझी आई इतकी घाणेरडी आहे की सांगायला देखील लाज वाटते. ईश्वराने अनाथ ठेवले तरी चालेल परंतु, अशी आई कुणालाही नको. माझ्या आईने 3 लाख रुपयांत माझा सौदा केला आहे. तो काही दिवसांपूर्वीच माझ्या आईचा मित्र बनला होता. 
- पोलिसांनी या पत्रावर वेळीच कारवाई करून आरोपी आई आणि तिच्या पुरुष मित्राला अटक केली आहे. त्या दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे. याच चौकशीत तिने सौद्यात ठरलेल्या रकमेपैकी 20 हजार रुपये घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी तो पैसा जप्त केला. सोबतच, अटक झालेला तिचा पुरुष मित्र आधीपासूनच विवाहित आहे. 


आजीचे घर सोडून आईकडे गेली होती मुलगी
रेवाडी येथून झज्जरला आपल्या दोन मुलींसोबत राहायला आलेल्या महिलेने आपल्या दोन्ही मुलींना आपल्या आईच्या गावात पाठवून दिले होते. आजीकडे राहताना या मुलींना नेहमीच आईची आठवण यायची. त्यामुळे, दोन्ही मुलींनी आजीचे घर सोडून आईच्या घरी येण्याचा प्रयत्न केला. परंतु, आईने आपल्या मुलींना कधीच परत बोलावले नाही. काही दिवसांपूर्वीच पीडित मुलगी आपल्या आईची भेट घेण्यासाठी रेवाडीहून झज्जरला आली होती. त्यावेळी घरात आईचा पुरुष मित्र देखील होता. त्याने या मुलीवर वाइट नजर टाकली. त्या व्यक्तीने जेव्हा महिलेला तिच्या मुलीबद्दल विचारले तेव्हा काहीच विचार न करता तिने 3 लाख रुपयांत मुलीची विक्री केली. 


महिलेचा पती 6 वर्षांपूर्वी बनला साधू
आरोपी महिलेचा पती 6 वर्षांपूर्वी साधू बनला आहे. तो साधू होऊन विविध ठिकाणी फिरत असतो. अशात घराचा खर्च उचलण्यासाठी ती रेवाडी सोडून झज्जर जिल्ह्यात राहायला आली. काही दिवस तिने मोल-मजुरी करून पैसे कमवले. यानंतर अधिक पैश्यांच्या लालसेत देहविक्रयाची वाट धरली. सोबतच आपल्या मुलीचा सौदा करून तिच्यावर बलात्कार सुद्धा घडवला. 

बातम्या आणखी आहेत...