आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Union Minister Jayant Sinha Facilitates Gau Rakshaks Convicted Of Mob Lynching At Jharkhand

Mob Lynching च्या दोषींना भेटले केंद्रीय मंत्री; माळ घालून गौरव, हाताने खाऊ घातली मिठाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी झारखंडच्या रामगड येथे जामीनावर सुटलेल्या मॉब लिन्चिंगच्या दोषींची भेट घेतली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी या भेटीत त्या लोकांच्या गळ्यात माळ टाकून गौरव केला आणि आपल्या हातांनी मिठाई देखील खाऊ घातली आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोवरून विरोधी पक्षांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. त्यावर नागरी उड्डयन राज्यमंत्री सिन्हा यांनी फोटोमध्ये आपणच असल्याची कबुली दिली. तसेच त्या लोकांची भेट एका लोकप्रतिनिधीच्या नात्याने घेतली होती असे स्पष्टीकरण दिले. कायदा आणि कोर्ट दोषींना शिक्षा देतील असेही ते पुढे म्हणाले आहेत. 


गोमांसच्या अफवेरून अलीमुद्दीनची हत्या...
गोमांसच्या संशयावरून गतवर्षी 29 मार्च रोजी रामगड येथे अलीमुद्दीन अंसारीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाने भाजप नेत्यासह 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर 29 जून रोजी हायकोर्टाने ही शिक्षा निलंबित करून त्यांना जामीन मंजूर केला. हेच लोक शनिवारी जयंत सिन्हा यांच्या हजारीबाग येथील निवासस्थानी पोहोचले. जामीनावर सुटलेल्यांमध्ये नित्यानंद महतोचा देखील समावेश आहे. तो भाजपचा रामगड येथील जिल्हा मीडिया प्रभारी होता.


हे कसले लोकप्रतिनिधी -विरोधक
या प्रकरणामध्ये विरोधी पक्षांनी भाजप शासित केंद्र सरकार आणि जयंत सिन्हा यांना धारेवर धरले. झारखंडमध्ये विरोधी पक्षाचे नेते हेमंत सोरेन म्हणाले, हार्वर्ड येथून शिक्षण घेऊन आलेला एक केंद्रीय मंत्री हत्येच्या दोषींचा सन्मान करतो हे अतिशय लाजीरवाणे आहे. माकप नेते सीताराम येचुरी म्हणाले, सिन्हा लिन्चिंगच्या दोषींसोबत उभे आहेत. मोदी सरकार अशा हिंदुत्वला प्रोत्हासित करत आहे, ज्यामध्ये मॉब लिन्चिंग सारख्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हाच भाजपचा खरा रंग आहे. ते निवडणूक जिंकण्यासाठी कुठलीही मर्यादा पाळत नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...