आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... तर अॅट्रॉसिटीबाबत केंद्र सरकार अध्यादेश काढेल- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश मागे घ्यावेत म्हणून केंद्राने फेरविचार याचिका दाखल केली आहे. यावर संबंधित कायद्यातील मूळ तरतुदी कोर्टाने पुन्हा बहाल केल्या नाहीत तर सरकार अध्यादेश काढेल, असे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटले आहे. पासवान म्हणाले,

 

केंद्राने या मुद्द्यावर विचार करण्यासाठी समितीची स्थापना केली असून सुप्रीम कोर्टात सविस्तर बाजू मांडूनही अॅट्रॉसिटी कायद्यातील मूळ तरतुदी बहाल केल्या गेल्या नाहीत, तर सरकार अध्यादेश काढेल. मूळ कायद्यातील तरतुदींमध्ये एका शब्दाचाही बदल होणार नाही, अशी आपली भूमिका आहे. 

बातम्या आणखी आहेत...