आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • जाणून घ्या, जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री महबूबा मुफ्तींबाबत Unknown Facts Of J&K First Lady CM Mehbooba Mufti

भाजप व जम्मू-काश्मीरला मेहबूबांपासून मुक्ती; जाणून घ्या, J&Kच्या पहिल्या महिला मुख्यमंत्र्यांविषयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - काश्मिरात दहशतवाद वाढल्याचे कारण पुढे करत भाजपने राज्यातील मेहबूबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे काश्मिरात नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. महबूबा मुफ्ती या जम्मू-कश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. महबूबांसमोर शपथविधीपासूनच राज्यातील भाजप-पीडीपी आघाडीत ताळमेळ बसवण्याचे आव्हान होते. काश्मीर खोऱ्यात शांतता कायम ठेवणे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आव्हान. परंतु खोऱ्यात सतत सुरू असलेल्या सैन्यविरोधी कारवाया पाहता दोन्ही बाबतींत त्यांना अपयश आल्याचे समोर आले आहे.

यानिमित्ताने divyamarathi.com जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री महबूबांबाबत विशेष माहिती देत आहे.

 

कायद्याच्या पदवीधर

> कायद्याच्या पदवीधर मेहबूबा (57) यांनी आपल्या वडिलांसोबत 1996 मध्ये काँग्रेसशी जोडून मुख्य प्रवाहातील राजकारणात पाऊल ठेवले होते. त्या वेळी दहशतवादाने खोऱ्यात थैमान घातलेले होते. पीडीपीच्या प्रसाराचे श्रेय मेहबूबा यांनाच दिले जाते.

> पीडीपीने आपल्या पक्षाच्या झेंड्यासाठी हिरवा रंग निवडला आणि आपल्या निवडलेल्या चिन्हाच्या रूपात पक्षाने सन 1987 च्या मुस्लिम युनाइटेड फ्रंटच्या कलम-दवात या चिन्हालाच निवडले. एकमेकांपेक्षा पूर्णपणे विरोधी विचारधारा ठेवणारे दोन पक्ष पीडीपी आणि भाजप आघाडी सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी मेहबूबा यांच्यासाठी कायम आव्हानात्मक राहिली. 

 

घटस्फोटित मेहबूबा यांना दोन मुली
> दोन मुलींच्या आई असलेल्या मेहबूबा यांची एक मजबूत राजकारणी म्हणून प्रतिमा उभी राहिली आहे. त्यांनी आपली पहिली विधानसभा निवडणूक काँग्रेस उमेदवाराच्या रूपात आपला गृह मतदारसंघ बिजबेहडातून जिंकली होती.

> भारतीय राजकारणात जेथे नेते आपल्या मुलांना उत्तराधिकारी बनवणे पसंत करतात, तेथेच मेहबूबा यांना त्यांच्या वडिलांनी उत्तराधिकारी म्हणून निवडले, तेव्हा हे एक मोठे परिवर्तन म्हणून पाहिले गेले.

> सन 1996 मध्ये काँग्रेसमधून राजकारणाच्या मुख्यप्रवाहात उतरलेल्या मेहबूबा यांना पीडीपीला पॉप्युलर करण्यात त्यांच्या वडिलांपेक्षाही महत्त्वाचे मानले जाते.

> घाटीमध्ये शांतता कायम करण्यासाठी त्यांचे वडील प्रयत्नरत होते आणि मेहबूबा नेहमी त्यांच्यासोबत उभ्या होत्या. या बाप-लेकीच्या जोडीने सन 1999 मध्ये आपल्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीची स्थापना केली. मुफ्ती मोहम्मद सईद आपल्यासोबत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या काही नाराज नेत्यांनाही आपल्या पक्षात घेऊन आले. सईद यांनी काँग्रेसमध्ये आपल्या राजकीय जीवनप्रवासाची 6 दशके घालवली होती.

> त्यानंतर मेहबूबा यांनीही नव्या पक्षाची जबाबदारी सांभाळली. मेहबूबा यांच्यावर मवाळ फुटीरतवादी राजकारणाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला जातो. 
> महबूबा दहशतवादी हिंसेतील पीडितांच्या घरी नेहमी जात असत आणि त्यांच्या कुटुंबीयांशी विशेषकरून महिलांशी स्नेहबंध जुळवत असत. सन 2004 मध्ये मेहबूबा यांनी आपली पहिली लोकसभा निवडणूक दक्षिण काश्मिरातून जिंकली. यापूर्वी सन 1999 मध्ये श्रीनगरमधून त्यांना लोकसभा निवडणुकीत उमर अब्दुल्ला यांच्यासमोर पराभवाचा सामना करावा लागला होता.  

 

हेही वाचा...

जम्मू काश्मीर : भाजपने मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढला, दहशतवादाचे कारण केले पुढे

 

बातम्या आणखी आहेत...