आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • डॉ. हेडगेवारांनी स्थापन केली होती जगातील सर्वात मोठी स्वयंसेवक संघटना Unknown Facts Of RSS And Founder Dr. Keshav Baliram Hedgewar Special Story

डॉ. हेडगेवारांनी या घरात केली होती RSSची स्थापना, जाणून घ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांच्या 78 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने divyamarathi.com वाचकांना RSS आणि डॉ. हेडगेवार यांच्याशी संबंधित विशेष माहिती देत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव कसे पडले आणि भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या या स्वयंसेवक संघटनेच्या कामाची पद्धत नेमकी काय आहे? याबाबत आज आम्ही माहिती देत आहोत.  

 

> डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनीच संघाची स्थापना केली हे सर्वश्रुत आहे. तथापि, ज्या घरात डॉ. हेडगेवारांचा जन्म झाला होता, त्याच घरात संघानेही 'जन्म' घेतला हे बहुतेकांना माहिती नाही. हे तब्बल 160 वर्षे जुने घर आज देशासाठी ऐतिहासिक वारसा ठरले आहे. कारण याच घरातून जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवक संघटनेच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली होती.

> याच घरात डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म 1 एप्रिल 1889 रोजी झाला होता. 8 वर्षे वयात त्यांनी शाळेत ब्रिटिश महाराणी व्हिक्टोरियाच्या राज्यरोहणदिनी भेटलेली मिठाई फेकून दि होती.

> 1920 मध्ये नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनात कार्यकर्त्यांच्या अध्यक्षाच्या रूपात त्यांनी संचालन केले होते.
> त्यांनी त्यांनी एका अशा संघटनेला रूप देण्याचा विचार केला, जी केवळ खास निमित्तानेच नव्हे, तर पूर्ण समाज तसेच देशाला संघटित करण्याचे कार्य करेल. वर्तमानात आरएसएसच्या 37190 ठिकाणांवर 58967 शाखा कार्यरत असल्याचे माहिती आहे.

> आरएसएसच्या शाखांमध्ये डॉ. हेडगेवार, त्यांची कार्यशैली यावर रोज चर्चा होतात. डॉ. हेडगेवार कशाप्रकारे कठीण समयी एखाद्या समस्येवर तोडगा काढायचे याबाबत स्वयंसेवकांना माहिती दिली जाते. त्यांनी अत्यंत कमी वयात आपल्या वयोगटातील मुलांच्या मदतीने कामाला सुरुवात केली होती. पण देशासाठी एक गट सोबत घेऊन काम करणाऱ्या तरुण बळीराम हेडगेवार यांना असे वाटले की, एक संघटना बनवून जे काम करत आहोत, त्याला नावही असणे गरजेचे आहे. त्यावेळी त्यांनी याबाबत त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली. कोणी शिवाजी संघ तर कोणी जरीपटका मंडळ अशी नावे त्यांना सुचवली. तर काही जणांनी हिन्दू स्वयंसेवक संघ नावही सुचवले होते. अखेच त्यांनी सर्वांचा सल्ला घेतल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव ठेवले.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, RSS बाबत विशेष माहिती...

बातम्या आणखी आहेत...