आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक Video: महिलेवर गँगरेपचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिस लागले कामाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्नाव - उत्तर प्रदेशच्या उन्नावमधून एक खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये 4 तरुण एका महिलेशी अभद्रता करताना दिसत आहेत. चारही आरोपी महिलेवर शारीरिक संबंध बनवण्याचा दबाव टाकत आहेत. व्हिडिओत महिला चारही आरोपींना भैय्या- भैय्या म्हणून सोडून देण्याची विनवणी करताना दिसत आहे, परंतु हे 4 ही नराधम तिला जंगलामध्ये फरपटत नेताना दिसत आहेत. दुसरीकडे, एका आरोपीने पूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हा Viral Video व संंबंधित काही Photos... 
 

काय आहे व्हिडिओत...

व्हायरल व्हिडिओमध्ये 4 नराधम महिलेवर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकताना दिसत आहेत. महिला याचा विरोध करताना दिसत आहे. परंतु हे तरुण व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न करताना स्पष्ट दिसत आहे. सूत्रांनुसार, व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा असून व्हायरल होऊनही आरोपी उजळमाथ्याने फिरत आहेत. हे प्रकरण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर खळबळ उडाली आहे.

व्हायरल व्हिडिओ हा उन्नावच्या  गंगाघाट परिसरातील आहे. हा अगदी निर्मनुष्य परिसर आहे. सध्या व्हिडिओ व्हायरल्य झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. व्हिडिओ पाहून प्रत्येकाला धक्का बसत आहे. 

 

काय म्हणतात पोलिस?
उन्नावचे एसपी अनुप सिंह म्हणाले की, एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका महिलेवर 4 तरुण अभद्रता करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा पोलिस शोध आहेत. व्हिडिओतील तथ्य तपासल्यानंतर आरोपींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हा Viral Video व संंबंधित काही Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...