आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपी CM हेल्पलाइन सेंटरमधून बेशुद्धीच्या अवस्थेत निघाल्या मुली, छेडछाडीचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - 'बेटी बचाओ-बेटी पढाओ'ची घोषणा देणाऱ्या सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयातच मुलींच्या शोषणाचे प्रकरण समोर आले आहे. महिला दिनाच्या दुसऱ्या दिवशी सीएम हेल्पलाइन कॉल सेंटरमध्ये महिलांचे शोषण होत असल्याचा आरोप झाला आहे. महिला कर्मचाऱ्यांना एका रुममध्ये बंद करण्यात आल्याचा आरोप आहे. तिथे महिला कर्मचाऱ्यांना टॉर्चर केले जात होते. प्रकार एवढा वाढला होता की काही मुली बेशुद्ध झाल्या होत्या. घाई गडबडीत त्यांना लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

 

काय आहे मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रकरण? 
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातील हे प्रकरण नसून गोमतीनगर येथील सायबर टॉवर येथील मुख्यमंत्री हेल्पलाइन ऑफिसमधील ही घटना आहे. 
- सीएम हेल्पलाइनचे काम स्योरविन नावाच्या एका खासगी बीपीओ कंपनीला देण्यात आले आहे. 
- मिळालेल्या माहितीनुसार, येथील महिला कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांपासून पगार दिला गेला नाही. त्याविरोधात त्यांचे आंदोलन सुरु होते. 
- मुलींचा आरोप आहे की त्यांचा सुपरवायझर अनुराग आणि टीम लीडर अशुतोष यांनी बळजबरीने कोऱ्या कागदावर त्यांच्या सह्या घेतल्या आहेत. 
- एवढेच नाही तर मुलींना अपशब्दही वापरण्यात आल्याचा आरोप आहे. 

 

पोलिसांवर आरोप - मुलींना म्हणाले आयुष्य  उद्ध्वस्त  करुन टाकू... 
- सीएम हेल्पलाइनमधील महिला कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाला काही युवतींनी वाचा फोडली. 
- मुली शेजारी असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये गेल्या. त्यांनी सीएम हेल्पलाइन कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी मुलींनाच दम भरला आणि तुम्हाला जेलमध्ये टाकून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करु, अशी धमकी दिली. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1500 कर्मचाऱ्यांचा गेल्या चार महिन्यांपासून पगार झालेला नाही.
- 7 मार्च रोजी कर्मचाऱ्यांनी कार्यालयाबाहेर रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, रडून रडून बेहाल झाल्या मुली...

बातम्या आणखी आहेत...