आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 वर्षांच्या इंजिनिअरने CM योगींचा गड जिंकला, पती-पत्नीकडे मिळून 77 हजार रुपये रोख संपत्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंजिनिअर असलेल्या 29 वर्षांच्या प्रवीणकुमार निशादला समाजवादी पक्षाने गोरखपुरमधून तिकीट दिले होते. - Divya Marathi
इंजिनिअर असलेल्या 29 वर्षांच्या प्रवीणकुमार निशादला समाजवादी पक्षाने गोरखपुरमधून तिकीट दिले होते.

जयपूर/गोरखपूर - प्रवीणकुमार फक्त 2 वर्षांचा होता तेव्हा भाजपने गोरखपूरवर प्रथम झेंडा फडकवला होता. तेव्हापासून आतापर्यंत, म्हणजे तब्बल 27 वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या गोरखपूरमध्ये 29 वर्षांच्या तरुणाने विजय मिळवला आहे. प्रवीणकुमार निशाद हा मॅकेनिकल इंजिनिअरची नोकरी सोडून गोरखपुर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याने जे यश मिळवले आहे त्यामुळे संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः येथून पाचवेळा खासदार राहिले होते. प्रवीणकुमार निवडणूक लढवण्यापूर्वी राजस्थानमध्ये एका खासगी कंपनीत प्रोडक्शन इंजिनिअर होता. नोकरीत रस नसल्यामुळे त्याने राजकारणात पाऊल ठेवले आणि आता थेट लोकसभेत जाणार आहे. प्रवीणकुमारला एकूण 4,56,437 मते मिळाली. 

 

पत्नीकडे 32,000 तर स्वतःकडे 45,000 रुपये रोख 
- प्रवीणकुमार निशादने 2008 मध्ये बी.टेक केले. त्यानंतर 2009 ते 2013 पर्यंत त्याने राजस्थानमधील भिवाडी येथे एका खासगी कंपनीत प्रोडक्शन इंजिनिअर म्हणून नोकरी केली. 
- तेव्हा राज्यात काँग्रेसचे सरकार होते. 
- राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आणि त्याच्या एक वर्ष आधी 2013 मध्ये राजकारणात नशीब आजमावण्यासाठी गोरखपुरमध्ये आला. 
- प्रवीणकुमारचे वडील डॉ. संजय कुमार निशाद यांनी निशाद पार्टीची स्थापना केली. संजय निशाद यांनी गोरखपूरची निवडणूक लढवली. त्यात ते पराजित झाले. 

 

चार वर्षे राजस्थानात केली नोकरी 
- गोरखपुरचे खासदार योगी आदित्यनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर येथे पोटनिवडणूक झाली. समाजवादी पक्षाने प्रवीणकुमार यांना येथून तिकीट दिले. 
- निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात प्रवीणकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 45,000 रुपये रोख तर त्यांची सरकारी नोकर असलेली पत्नी रितिका यांच्याकडे 32,000 रुपये रोख असल्याचे म्हटले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रवीणकुमारने असा केला प्रचार...