आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ACCIDENT: उत्तराखंडच्या दरीत कोसळली मिनी बस; भीषण अपघातात 47 जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून- उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यात धुमाकोट भागात रविवारी एक प्रवासी बस २०० फूट दरीत कोसळली. यात ४७ जणांचा मृत्यू झाला, तर ११ जखमी झाले. दरीत कोसळल्यानंतर बसचे दोन तुकडे झाले आणि दरीत बस कोसळत असताना प्रवासी बाहेर फेकले गेले. यामुळे बहुतांश जण मृत्युमुखी पडले. बस निघताना काही प्रवाशांना रामनगरहून दिल्ली बस गाठायची होती म्हणून २८ आसनी बसमध्ये खच्चून प्रवासी भरले होते.  


अपघातग्रस्त मिनी बस रामनगरच्या दिशेने निघाली होती. परंतु, ऐनवेळी दुसऱ्या एका वाहनाला वाचवण्याच्या नादात भोआन येथे बसवर चालकाचा ताबा सुटला. यानंतर बस दरीत कोसळली. सर्वच जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातच जखमींपैकी काहींची परिस्थिती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या अपघातात मृत्यूमुखी पावलेल्यांच्या कुटुंबियांविषयी सांत्वना व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...