आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर प्रदेशात मॅजिक व्हॅन ट्रकवर आदळली अपघातात १२ ठार ; चिमुरडी बचावली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उभ्या ट्रकला प्रवासी वाहन धडकले. अपघात एवढा भीषण होता की जागेवर 9 जण ठार. - Divya Marathi
उभ्या ट्रकला प्रवासी वाहन धडकले. अपघात एवढा भीषण होता की जागेवर 9 जण ठार.

शहाजहांपूर /लखीमपूर - उत्तर प्रदेशातील लखीमपूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी  मॅजिक व्हॅन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात १२ जण ठार झाले, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात आईच्या कुशीत बसलेली २ वर्षांची चिमुरडी आश्चर्यकारकरीत्या बचावली. पण तिची आई दगावली.  


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅजिक व्हॅनमधून १७ प्रवासी शहाजहांपूर ते सीतापूरकडे जात होते. दरम्यान, लखीमपूर भागातील पसगवाच्या उचौलिया महामार्गावर अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की, ९ जण जागीच ठार झाले, तर तिघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अन्य चार जखमींवर शहाजहांपूर येथे उपचार सुरू आहेत.  


सर्व जण झोपेत होते, डोळे उघडले तर रुग्णालयात  

अपघातात जखमी साबीर निशा (५०) यांनी सांगितले, व्हॅनमधील सर्व जण झोपेत होते. चालकास डुलकी लागली. त्यामुळे मॅजिक व्हॅन सरळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. मी डोळे उघडून पाहते तर रुग्णालयातच दिसले. माझ्यासोबत सून व २ वर्षांची नात व १२ वर्षांचा नातू होता. नात वाचली, पण सून मृत्युमुखी पडली. 

बातम्या आणखी आहेत...