आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine's Day: प्रेमाच्या प्रतिकासमोर प्रेमी युगुलांनी असे केले प्रेम व्यक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा (उत्तर प्रदेश) - व्हॅलेंटाइन डे अधिक शानदार आणि यादगार करण्यासाठी अनेक कपल्सने बुधवारी ताजमहाल येथे गर्दी केली होती. कोणी सेल्फी घेत होते तर कोणी ताजच्या पार्श्वभूमीवर किस करुन आपले प्रेम व्यक्त करत होते. काहींनी प्रेमाच्या प्रतिकासमोर आपल्या पार्टनरला प्रपोज केले. तर कोणी सोबत जगण्या-मरण्याच्या आणा-भाका घेतल्या. 

 

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथून व्हॅलेंटाइन साजरा करण्यासाठी भारतात आलेल्या मोनिकाने सांगितले, की 2004 मध्ये ती व्हॅलेंटाइन डेला ताज पाहाण्यासाठी आली होती. आता 14 वर्षांनी ती पुन्हा एकदा 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी आली आहे. 

 

Kiss करुन केले प्रेम व्यक्त 
- ताज महाल येथे व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी फक्त देशातूनच नाही तर परदेशातून कपल्स आले. 
- प्रेमाचे प्रतिक असलेल्या ताजच्या पार्श्वभूमीवर एका विदेशी जोडप्याने किस करत व्हॅलेंटाइनच्या शुभेच्छा दिल्या. 
- ताज महालसमोर उभे राहून फोटो काढून घेत अनेकांनी हा दिवस स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न केला. 
- बंगळुरु येथून पतीसोबत आलेल्या सुजाना हिने सांगितले की लग्नाआधी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी येथे आले होते. आता लग्नानंतर ताज महालचा दिदार करत आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रेमाच्या प्रतिकासमोर अनेकांनी व्यक्त केले प्रेम 
 

बातम्या आणखी आहेत...