आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइन डे ला प्रेमी जोडप्यांसोबत मारहण, सोडण्यासाठी विनवण्या करत होत्या तरूणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबलपूर- व्हेलेन्टाइन डे वर प्रेमी युगुलांना प्रेम व्यक्त करणे महागात पडले. जबलपूरमध्ये एका समाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पार्कमध्ये बसलेल्या आणि बाइकवरून जाणाऱ्या प्रेमी जोडप्यांना निशान्यावर घेतले. त्यांनी केवळ जोडप्यांना रोखलेच नाही, तर त्यांच्यासोबत गैरवर्तन देखील केले. या दरम्यान प्रेमी जोडपे हात जोडून सोडून देण्याची मागणी करत राहिले, तरी तरूण त्यांना मारहण करत राहिले.


मिळालेल्या माहितीनुसार, व्हॅलेन्टाइन डे वर सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच प्रेमी जोडप्यांविरोधात मोहिम सुरू केली होती. जबलपूरच्या देवताल पार्कमध्ये मोठ्या संखेने पोहोचलेल्या या कार्यकर्त्यांनी एकच गोधळ घातला. हातात काठ्या घेऊन पार्कमध्ये शिरले आणि तरूणांना पाहून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यानी तरूणींसोबत देखील गैरवर्तन केले.


कार्यकर्त्यांनी जोडप्यांना मारहण तर केलीच शिवाय त्यांचे वाहन देखील हिसकावून घेतले. गोंधळाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच गोंधळ घालणाऱ्या काही तरूणांना पकडून प्रेमी जोडप्यांची सुटका केली आणि आपल्यासोबत घेऊन गेले.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...