आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • आसारामच्या जन्मठेपेवर पीडिता म्हणाली निकालावर समाधानी पण.. Victim Reaction On Asaram Case Verdict

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसारामच्या जन्मठेपेवर पीडिता म्हणाली- निकालावर समाधानी, पण 2 जणांची सुटका नको होती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहजहांपूर - आसारामला जन्मठेपेची शिक्षा मिळाल्याने पीडितेने आनंद व्यक्त केला आहे. तिने बुधवारी निकाल आल्यानंतर म्हटले की, जर आणखी 2 जणांना शिक्षा मिळाली असती, तर अधिक चांगले झाले असते. तथापि, जोधपूर कोर्टाने 5 आरोपींपैकी दोघांना मुक्त केले आहे. आसारामला जन्मठेप, तर शिल्पी आणि शरतचंद्रला 20-20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

- पीडितेच्या वडिलांनी दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, आमची साथ देण्यासाठी न्यायपालिका आणि मीडियाचे आभार मानतो. जर मीडियाने हे हायलाइट केले नसते, तर या लोकांनी आम्हालाही जिवे मारले असते आणि कुणालाच काहीही कळले नसते.

- वडील म्हणाले, मुलीला मीडियासमोर यायचे नाही. कारण तिला सर्व जुन्या गोष्टी विसरायच्या आहेत. आम्हालाही हे प्रकरण विसरून पुढे जायचे आहे.

 

चार कारणांमुळे आसाराम ठरला दोषी 
1) जिथे लाखो लोकांच्या आस्थेचा, भावनेचा संबंध असतो, अशा व्यक्तीने केलेला गुन्हा अधिक गंभीर असतो. 
2) ज्यांच्यावर अल्पवयीन मुला-मुलींची जबाबदारी असते त्यांनीच शोषण करणे हे गंभीर प्रकरण असते.
3) पॉक्सो अॅक्टमध्ये 2012 मध्ये अल्पवयीनचे वय 16 वरुन 18 करण्यात आले होते. पीडिता 17 वर्षांची होती. या नव्या संशोधनानंतर म्हणजे, 2013 मध्ये आसारामवर गुन्हा दाखल झाला होता, त्यात पॉक्सो अॅक्ट अंतर्गत कलमे लावण्यात आली होती. 
4) 2) द क्रिमिनल लॉ अमेंडमेंटमध्ये 2013 मध्ये दुष्कर्माची व्याख्या बदलण्यात आली. त्यामुळे कलम 376 लावण्यात आले.

 

निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील करु शकणार
- पॉक्सो अॅक्ट अंतर्गत स्थापन करण्यात आलेले कोर्ट हे जिल्हा सत्र न्यायालयाच्या स्तरावरील असते. या कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर थेट हायकोर्टात अपील करता येणार आहे.

 

आसारामसह तीन जण दोषी

- लैंगिक अत्याचार प्रकरणी आसारामला दोषी ठरवण्यात आले असून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यासह शिल्पी उर्फ संचिता गुप्ता, शरदचंद्र ऊर्फ शरतचंद्र दोषी यांना प्रत्येकी 20-20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर त्याचा सेवादार प्रकाश, शिवा यांना निर्दोष मुक्त केले आहे.

- शिल्पी ही आसारामच्या आश्रमातील वॉर्डन होती. तर शरद हा त्याचा सेवादार आहे.

- आसारामने साडेचार वर्षांत जवळपास डझनभर जामीन याचिका दाखल केल्या मात्र त्याला जामीन मिळाला नाही. दुसरीकडे, या प्रकरणातील सहआरोपी आणि त्याचा सेवादार प्रकाश याने जामीन घेतला नाही, तो जेलमध्ये आसारामची सेवा करत असल्याची माहिती होती.

 

आसारामवर पीडितेने लावले हे आरोप?

- आसारामच्या गुरुकुलात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने आपल्या जबाबात म्हटले की, तिला फिट्स यायचे. यावर गुरुकुलाच्या एका शिक्षिकेने माझ्या आईवडिलांना बोलावून माझ्यावर आसारामकडून उपचार करायला सांगितले. यानंतर तिच्या आई-वडिलांनी आसारामला भेटण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. शेवटी त्यांनी मला जोधपूरला नेण्यासाठी सांगितले.

- जोधपूरच्या जवळ मणाई गावातील फार्म हाऊसमध्ये मला बोलावण्यात आले. माझ्या आईवडिलांना बाहेर रोखण्यात आले. त्यांना सांगण्यात आले की, आसाराम विशेष पद्धतीने माझ्यावर उपचार करतील. यानंतर मला एका रूममध्ये पाठवण्यात आले. तेथे आसाराम आधीपासूनच हजर होता. त्याने माझ्यासोबत अश्लील कृत्य केले. सोबतच धमकी दिली की, ती जर ओरडली तर रूमबाहेर बसलेल्या तिच्या आईवडिलांना ठार केले जाईल. मला ओरल सेक्स करण्यासाठी सांगितले, परंतु मी नकार दिला.

 

5 वर्षांच्या खटल्यात 5 आरोपींवर निकाल- या 5-5 तथ्यांवरून जाणून घ्या

का ठरला दोषी?

- पीडिता ना खचली, ना भ्यायली, 27 दिवसांच्या दीर्घ सुनावणीत 94 पानी जबाब.

- तपास अधिकाऱ्याने 60 दिवसांपर्यंत प्रत्येक कलमावर दिले उत्तर, 204 पानी जबाब.
- पीड़ितेला सज्ञान सिद्ध करण्याचा सर्वंकष प्रयत्न, वयावर संशय घ्यायला जागा नाही.
- पीडित कुटुंबाच्या कहाणीला सपोर्ट करणाऱ्या कृपालसिंहचा जबाब, ज्याची हत्या झाली.
- पूर्ण खटला बलात्काराच्या नव्या परिभाषेवर टिकून, ती जर बदलली तर खटलाच विस्कळीत झाला असता.

 

आरोप अतिशय गंभीर
- जेथे लाखो लोकांची श्रद्धा निगडित असते, त्याचा गुन्हा सर्वात जास्त गंभीर मानला जातो.
- ज्याच्या संरक्षणात अल्पयीन राहते, तोच जर शोषण करत असेल तर गुन्हा आणखी गंभीर बनतो.
- बचाव पक्षाचा जोर सज्ञान सिद्ध करण्याचा होता, त्यांना त्यात यश मिळाले नाही.
- पीड़ितेच्या वडिलांवर 50 कोटींची मागणी केल्याचा आरोप, 2008 पासून सिद्ध झाला नाही.
- खटल्या 3 मुख्य साक्षीदारांपैकी दोघांचा मृत्यू झाला आणि एकाच्या हत्येचा प्रयत्न झाला.

 

यानंतरही तुरुंगातून सुटकेची शक्यता कमी, कारण...

- पॉक्सो अॅक्ट 2012 मध्ये अल्पवयीन मुलीची वय 16 ते 18 झाले, पीड़िता 17व्या वर्षात होती.
- द क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 2013 मध्ये बलात्काराची परिभाषा बदलण्यात आली, यामुळे 376 लागले.
- कलम असे की कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा होईल, जन्मठेपेचीही शक्यता होती.
- गुजरात जेलमध्ये ट्रान्सफर होईल, तेथे ट्रायल पेंडिंग असल्याने बाहेर येण्याची शक्यता कमीच.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज व फॅक्ट्स... 

बातम्या आणखी आहेत...