आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • आसारामपासून वाचण्यासाठी अॅसिड प्यायच्या तरुणी, अशी आहे Inside Story Victim Told How Girls Were Treated Inside Ashram Of Asaram Bapu

आसारामपासून वाचण्यासाठी अॅसिड प्यायच्या तरुणी, अशी आहे Inside Story

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषणप्रकरणी आसारामसहित 3 आरोपींना स्पेशल कोर्टाने दोषी ठरवले आहे. आसारामला आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून इतर दोन दोषींना 20-20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निकालाआधीच जोधपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते. हे झाले एक प्रकरण, परंतु आसाराम इतर पीडिता म्हणाल्या की, आश्रमात महिलांना जनावरासारखी वागणूक मिळायची.

 

अॅसिड प्यायची तरुणी, व्हायचा भेदभाव
- शाहजहांपूर येथील रहिवासी पीड़ितेद्वारे लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर ऑक्टोबर 2013 मध्ये आसारामला अटक करण्यात आली. त्याच्या जवळजवळ दोन महिन्यांनी सुरतच्या दोन बहिणींनी आसाराम व त्याचा मुलगा नारायण साईवर बलात्काराचा आरोप केला होता.
- मोठ्या बहिणीच्या मते, सन 2001 ते 2006 मध्ये अहमदाबादच्या आश्रमात आसारामने तिच्यावर अत्याचार केले होते. तर तिच्या बहिणीने सांगितले की, सूरतेतील आश्रमात नारायण साईंनी तिला आपली शिकार बनवले.
- मोठ्या बहिणीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले, "बापू म्हणायचा की, मीच ईश्वर आहे. मी कृष्ण आहे आणि तुम्ही सर्व माझ्या गोपिका आहात."
- "आश्रमात मोठ्या प्रमाणावर भेदभाव व्हायचा. सिंधी महिलांना जास्त सुविधा दिल्या जात. आसारामच्या आसपास काही सिंधी महिला राहायच्या, ज्यांना मलंग म्हटले जायचे. सिंधी भक्तांनाही स्पेशल ट्रीटमेंट दिली जायची. एसीमध्ये राहून त्यांना सेवा करू दिली जायची. तर दुसरीकडे खेड्यापाड्यातून आलेल्या मुलींना-महिलांनकडून मजुरीकाम करवून घेतले जायचे. मी अनेक मुलींना त्रस्त होऊन अॅसिड प्राशन करताना पाहिले आहे. परिस्थिती बिघडल्यावर त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये मरण्यासाठी सोडून दिले जायचे."

 

टॉर्च दाखवून सिलेक्ट करायचा मुलींना
- रात्रीच्या वेळी राउंड मारताना आसाराम तरुणीच्या तोंडावर टॉर्च मारायचा. मग आपल्या अनुयायींना सिंधीमध्ये काहीतरी बोलून निघून जायचा.
- आसाराम गेल्यानंतर सिलेक्ट झालेल्या तरुणीला आसारामच्या मलंग महिला म्हणायच्या की, तुला खास आराधानेसाठी निवडण्यात आले आहे. तू खूप भाग्यशाली आहेस. त्या तरुणीला असे फसवून आसारामच्या खोलीत पाठवले जायचे.

 

नारायण साईचा अनौरस मुलगा
- पीड़ितेच्या मते, नारायण साईला आश्रमातीलच एका मुलीपासून मुलगा जन्मलेला आहे. त्याचे नाव मोक्ष आहे. ज्या मुलीकडून हा मुलगा झाला होता, तिचे लग्न नंतर एका रूपेश नावाच्या व्यक्तीशी लावण्यात आले. 
- पीड़ितेच्या मते, आसाराम बापू आणि त्याचा मुलगा नारायण स्वामी नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे. हे सर्व तिने कधी पाहिले नाही, परंतु सोबतच्या इतर मुली सांगायच्या.

 

कशी अडकली होती जाळ्यात... 
- पीड़ितेने सांगितले, तिचे अख्खे कुटुंब आधी आसारामचे भक्त होते. मग 2001 मध्ये नारायण स्वामीच्या संपर्कात आले.
- "कळले नाही त्यांनी काय केले होते, बहुतेक प्रसाद खाऊ घातला होता, यामुळे त्यांच्या प्रभावाने मी त्यांची भक्त बनले. जसे की मला संमोहित करण्यात आले. मी त्यांना माझे सर्वेसर्वा मानायला लागले होते."
- "आधी ते लोक कार्यक्रमाला बोलवायचे. मग ते सुंदर तरुणींचा हात पकडायचे, जवळ जाण्याचा प्रयत्न करायचे. मग आपल्या मलंग अनुयायींना सांगून तरुणीला जवळ आणायला सांगायचे."
- "नारायण स्वामीचा येथे हनुमान नावाचा एक मुलगा होता जो तरुणींना नेण्या-आणण्याचे काम करायचा."
- "मला त्यांना फाशी झालेली नकोय. त्यांना एकदाच नाही, तर तडपून-तडपून मृत्यू यावा. यांनी जसे लोकांना तडफडायला लावले आहे, तशीच ट्रीटमेंट यांनाही मिळाली पाहिजे."

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...