Home | National | Other State | Video of Tej Pratap Yadav dressed up as Lord Shiva

लालुंच्या मुलाने जेव्हा घेतला महादेवाचा अवतार, सुरू झाल्या बम बम भोलेच्या गर्जना

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 31, 2018, 10:34 AM IST

पाटणा येथील शंकराच्या मंदिरात तेजप्रताप यांनी शंकराची पुजा केली, त्यावेळी त्यांनी शंकरासारखाच पोषाख केला होता.

  • Video of Tej Pratap Yadav dressed up as Lord Shiva

    पाटणा - राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव गेल्या काही दिवसांपासून कायम माध्यमात चर्चेच असतो. तेजप्रताप यादव आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांनी धारण केलेला शंकराचा अवतार. पाटणा येथील शंकराच्या मंदिरात तेजप्रताप यांनी शंकराची पुजा केली, त्यावेळी त्यांनी शंकरासारखाच पोषाख केला होता.


    उत्तर भारतामध्ये श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त महादेवाच्या विविध मंदिरांमध्ये भक्तांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. राजकीय नेतेही या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी करत असतात. दर्शनाबरोबरच मतदारांसमोर जाण्याची ही एक संधीही असते. त्यामुळे नेते मोठ्या प्रमाणावर मंदिरांमध्ये गर्दी करत असतात. त्यातही श्रावण सोमवारी मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते. या श्रावण सोमवारच्या निमित्तानेच लालुंचा मुलगा आणि बिहारचे माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव वैद्यनाथ धामला दर्शनासाठी निघाले. मात्र यावेळी त्यांनी शिवशंकरासारखा पोषाख केल्याचे पाहायला मिळाले.

    शंकराचा पोषाख धारण केल्यानंतर तेजप्रताप यांना पाटणा येथील शंकराच्या मंदिरामध्ये पुजा केली. त्यानंतर ते देवघरयेथे असलेल्या बाबा वैद्यनाथ धाम येथे दर्शन घेण्यासाठी रवाना झाले. तेजप्रताप यांचा पुजा करतानाचा एक व्हिडिओही एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे. त्यात तेजप्रताप शंकराची पुजा करताना, शंख वाजवताना दिसत आहेत.

  • Video of Tej Pratap Yadav dressed up as Lord Shiva
  • Video of Tej Pratap Yadav dressed up as Lord Shiva

Trending