Home | National | Other State | पावसामुळे अमरनाथ यात्रा बालटाल-पहलगाममध्ये रोखण्यात आली, पुढचे 48 तास मुसळधार पावसाचा इशारा Weather Round Up Amarnath Yatra Delays Due To Heavy Rain

पावसामुळे अमरनाथ यात्रा बालटाल-पहलगाममध्ये रोखण्यात आली, पुढचे 48 तास मुसळधार पावसाचा इशारा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 28, 2018, 09:26 AM IST

मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळी अमरनाथ यात्रा रोखण्यात आली आहे. अधिकारी म्हणाले, बालटाल आणि पहलगाम दोन्हीही मार्ग निसर

  • पावसामुळे अमरनाथ यात्रा बालटाल-पहलगाममध्ये रोखण्यात आली, पुढचे 48 तास मुसळधार पावसाचा इशारा Weather Round Up Amarnath Yatra Delays Due To Heavy Rain

    जम्मू - मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळी अमरनाथ यात्रा रोखण्यात आली आहे. अधिकारी म्हणाले, बालटाल आणि पहलगाम दोन्हीही मार्ग निसरडे झाले आहेत. यामुळे यात्रेकरू आणि वाहनांना पुढे नेणे धोक्याचे आहे. हवामान विभागाने पुढच्या 48 तासांपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

    पाऊस असूनही अनेक भाविक नुनवां पहलगाम बेस कॅम्पवरून चंदनवाडीसाठी रवाना झाले आहेत. पारंपरिक मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांना चंदनवाडी शेवटचा मुक्काम आहे. जम्मूच्या बेस कॅम्पवरून महिला, लहान मुले आणि साधूंसमवेत तब्बल 3000 भाविकांचा जत्था बुधवारी संध्याकाळी नुनवां पहलगाम आणि बालटाल येथे आला होता.

Trending