आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • प्रत्येकच्या खात्यात केव्हा येणार 15 लाख रुपए? पंतप्रधान कार्यालयाने दिले हे उत्तर What About 15 Lakh In Accounts Promised By PM Modi, Asked In RTI

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रत्येकाच्या खात्यात केव्हा येणार 15 लाख रुपये? पंतप्रधान कार्यालयाने दिले हे उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - गत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, जर विदेशातून काळा पैसा परत आला, तर देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये येऊ शकतात. लोकसभेनंतर ज्या राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या तेथेही हा मुद्दा चर्चेत राहिला. दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते मोहनकुमार शर्मा यांनी आरटीआय दाखिल करून पीएमओला 15 लाख रुपये केव्हा मिळणार असल्याचे विचारले. 

जाणून घ्या, पीएमओने काय उत्तर दिले... 

 

PMOचे उत्तर
पंतप्रधान कार्यालयाने म्हटले की, प्रत्येक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याची नरेंद्र मोदींच्या वचनपूर्तीची तारीख सांगणे माहितीच्या अधिकाराअंतर्गत येत नाही. यामुळे, याबाबत कोणतेही उत्तर दिले जाऊ शकत नाही. पीएमओने केंद्रीय माहिती आयोगाला ही माहिती दिली.

 

सन 2016 मध्ये मागितली होती माहिती
अर्ज करणारे मोहन कुमार यांनी नोटबंदी लागू झाल्याच्या 18 दिवसांनी 26 नोव्हेंबर 2016 रोजी पीएमओकडून ही माहिती मागितली होती की, प्रत्येक खात्यात 15 लाख रुपये देण्याचे वचन मोदी केव्हा पूर्ण करतील? उत्तर न मिळाल्याने प्रकरण केंद्रीय माहिती आयोगाकडे गेले. मुख्य माहिती आयुक्त आर. के. माथुर म्हणाले की, अर्ज करणाऱ्या व्यक्तीला पंतप्रधान कार्यालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पूर्ण माहिती दिलेली नाही. 

- आयोगानुसार, पीएमओने म्हटले की, 15 लाख रुपये जमा करण्याची तारीख काय असेल, आणि नोटबंदी लागू होण्याची माहिती प्रिंट मीडियापर्यंत आधीच कशी पोहोचली, या दोन्हींबाबत आरटीआई अॅक्टचे कलम 2(f) अंतर्गत माहितीच्या परिघात येत नाही.

 

अमित शहा म्हणाले होते- निवडणुकीचा जुमला
सन 2015 मध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांना हाच प्रश्न एका टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात आला होता. यात ते म्हणाले होते की, हा फक्त एक निवडणुकीपुरता जुमला होता.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित अाणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...