आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'असे\' शारीरिक संबंध ठेवणे कायद्याने आहे गुन्हा, जाणून घ्या कलम 377 बद्दल सबकुछ!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलम-377 या देशात इंग्रजांनी 1862 मध्ये लागू केले होते. या कायद्यानुसार अनैसर्गिक लैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. - Divya Marathi
कलम-377 या देशात इंग्रजांनी 1862 मध्ये लागू केले होते. या कायद्यानुसार अनैसर्गिक लैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे.

स्पेशल डेस्क - समलैंगिकता तसेच अनैसर्गिक लैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या कलम-377 वर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, नाज फाउंडेशन प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या 2013 च्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची आवश्यकता आहे, कारण आम्हाला वाटते की, यात संविधानाशी निगडित मुद्दे जोडलेले आहेत.

 

दोन सज्ञान व्यक्तींमधील शारीरिक संबंध गुन्हा आहे का, यावर चर्चा होणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेने कुणालाही निवडणाऱ्यांना भयाच्या वातावरणात ठेवले जाऊ शकत नाही. कोणतीही इच्छा कायद्याच्या चौकटीबाहेर असू शकत नाही. परंतु सर्वांना अनुच्छेद 21 अंतर्गत जगण्याच्या अधिकारानुसार कायद्याच्या परिघात राहण्याचा अधिकार आहे. तथापि, सुप्रीम कोर्ट प्राण्यांशी संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रकरणात सुनावणी करणार नाही. जे या कलमानुसार गुन्हा ठरवण्यात आले आहे.

 

जाणून घ्या कलम 377 म्हणजे काय?

> कलम-377 या देशात इंग्रजांनी 1862 मध्ये लागू केले होते. या कायद्यानुसार अनैसर्गिक लैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे.
> जर एखाद्या स्‍त्री-पुरुषाने परस्पर सहमतीने अनैसर्गिक संबंध ठेवले, तर या कलमानुसार या गुन्ह्यासाठी 10 वर्षे कैद आणि दंडाची तरतूद आहे.
> एखाद्या प्राण्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यास या कायद्यानुसार जन्मठेप किंवा 10 वर्षे कैदेची तसेच दंडाची तरतूद आहे. 
> सहमतीने असलेला दोन पुरुष अथवा दोन महिलांदरम्यानचा सेक्‍सही या कायद्यांतर्गत येतो.
या कलमानुसार गुन्हा दखलपात्र ठरवण्यात आला आहे. यात अटकेसाठी कोणत्याही वॉरंटची आवश्यकता नसते.
> संशयाच्या आधारे किंवा  गुप्त सूचनेचा हवाला देऊनही पोलिस याप्रकरणी कोणालाही अटक करू शकतात.

> कलम-377 एक अजामीनपात्र गुन्हा आहे.

 

150 वर्षांत फक्त 200 दोषी 

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ज्या कलम 377 वर अनेक वर्षांपासून देशभरात चर्चा सुरू आहे, त्याअंतर्गत अनैसर्गिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात 150 वर्षांत फक्त 200 व्यक्तींनाच दोषी ठरवण्यात आलेले आहे.

 

LGBT म्हणजे काय?
समलैंगिक, उभयलिंगी आणि लिंग बदलव करणाऱ्या लोकांना मिळून LGBT (लेस्बियन, गे, बायसेक्‍सुअल, ट्रांसजेंडर) समुदाय बनतो.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...

 

 

बातम्या आणखी आहेत...