आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#WhatsApp: फेक न्यूज रोखण्यासाठी येणार नवं फीचर, एकावेळी फक्त 5 जणांना फॉरवर्ड करता येईल मेसेज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- सरकारने एका दिवसापूर्वीच व्हॉट्सअॅपला दुसरी नोटीस बजावली होती.
- सरकारने व्हॉट्सअॅपला अफवा आणि चिथावणीखोर मेसेजेस रोखण्यासाठी उपाय शोधायला सांगितले.

 

नवी दिल्ली- तुम्ही व्हॉट्सअॅपचा वापर करत असाल तर आता एका वेळी पाचपेक्षा अधिक चॅटवर मेसेज फॉरवर्ड करता येणार नाही. खोट्या बातम्या आणि अफवांवर लगाम लागावा म्हणून युजर्ससाठी व्हॉट्सअॅपने ही मर्यादा घातली आहे. क्विक फॉरवर्ड बटणाचा वापरही युजर्स करू शकणार नाहीत. कंपनीने केवळ भारतीय युजर्ससाठी हा बदल केला आहे.


भारतातील बहुतांश युजर्स इतर देशांच्या तुलनेत अधिक मेसेज, व्हिडिओ आणि फोटो फॉरवर्ड करतात, असे व्हॉट्सअॅपचे म्हणणे आहे. जगभरात सध्या सुमारे १०० कोटी व्हाट्सअॅप युजर्स असून यातील सुमारे २० कोटी केवळ भारतात आहेत.


गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवा आणि त्यानंतर जमावाकडून झालेल्या मारहाणीत अनेक निष्पाप लोकांचे झालेले मृत्यू पाहता व्हॉट्सअॅपने १० मुद्द्यांवर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यात कोणत्या मेसेजपासून सावध राहावयाचे आहे हे स्पष्ट करण्यात आले होते. कोणत्याही कायद्याच्या कचाट्यात अडकायचे नसेल तर या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे कंपनीने म्हटले होते. एखादा फाॅरवर्ड केलेला मेसेज, बनावट फोटो किंवा लिंकची माहिती घेणे तसेच भीतिदायक मेसेज इतरांना फॉरवर्ड करू नयेत म्हणून जागरूक राहण्याविषयीची सूचना कंपनीने केली होती.


एखाद्या समाजकंटकाकडून अशा खोट्या बातम्या िकंवा अफवा पसरवल्या जात असतील तर याचे माध्यम झालेल्या कंपन्यांना जबाबदारी झटकता येणार नाही, असे माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने बुधवारी नमूद केले होते. यानंतर व्हॉट्सअॅपला दुसऱ्यांदा नोटीस बजावून मंत्रालयाने यावर ठोस उपाययोजना करण्याची सूचना केली होती.

 

नवे फीचर असे करेल काम
इन्स्टंट मेसेजिंग अॅप आता व्हॉट्सअॅपवर पाठवले जाणारे सर्व मेसेज, व्हिडिओ आणि फोटो फॉरवर्ड करण्यावर विशिष्ट मर्यादा घालेल. भारतात व्हॉट्सअॅपवरून मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी ५ चॅटची मर्यादा असेल. याची अगोदर चाचणी घेतली जाईल. म्हणजेच आता एका वेळी पाचहून अधिक काँटॅक्ट्सना एकच मेसेज फॉरवर्ड करता येणार नाही. एका अकाउंटवरून एक मेसेज पाच वेळा फॉरवर्ड झाला असेल तर त्या मोबाइलवरील व्हॉट्सअॅपमध्ये फॉरवर्डचे ऑप्शन डिसेबल होईल. याची चाचणीही सुरू करण्यात आली आहे.

 

विधानसभा निवडणुकीत नव्या टूलचा होईल वापर: 
व्हॉट्सअॅप आपल्या फेक न्यूज व्हेरिफिहकेशन टूल 'Verificado'ला या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीत वापर करणार आहे. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही याचा वापर केला जाईल. जेणेकरून मतदानावर फेक न्यूजचा परिणाम होऊ नये.

 

मेक्सिकोमध्ये झाला होता वापर: 
व्हॉट्सअॅपच्या या टूलचा वापर जूनमध्ये मेक्सिकोमध्ये झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीत करण्यात आला होता. याअंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) टेक्नोलॉजीने मेसेजला स्कॅन केले जाते आणि त्यातील फॅक्ट्स चेक केले जातात. जर फॅक्ट चुकीचे आढळले, तर त्याला फिल्टर करून प्लॅटफॉर्मवरून हटवले जाते. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...