आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरमांडवात नवरदेवाचे कृत्य पाहून नवरीने घेतला बोल्ड निर्णय- 'आता काहीही होवो याच्याशी लग्न करणार नाही'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात वरमाला घातल्यानंतर नातेवाइकाच्या कडेवरून उतरताच नवरी त्याला जोरदार थप्पड लगावते. यामुळे तेथे उपस्थित प्रत्येकाला धक्का बसतो. कारण काय होते, कुणालाच कळू शकले नाही. यानिमित्ताने तुम्हाला एका अशा लग्नाबाबत सांगत आहोत, जेव्हा नवरीने धाडसी निर्णय घेऊन सर्वांना चकित केले होते. 


भरमांडवात नवरीने मोडले लग्न, आईवडीलही झाले खुश...
- 21 मे 2017 रोजी काशी (वाराणसी) रोहनियां परिसरातील रामलाल चौहानच्या कन्येचे लग्न होते. मुलगी शीतल (बदललेले नाव) हिचे लग्न मिर्झापूरच्या जागरण चौहानशी ठरले होते.
- त्या रात्री वऱ्हाड आले. द्वारपूजेनंतरही वऱ्हाडी दारूच्या नशेत तर्रर होऊन अर्धा तास नाचत राहिले. घरातील महिलांवर अश्लील कॉमेंट करत राहिले. नवरदेवही नशेत होता. वरमाला घालण्याची वेळ आली. परंतु तेव्हा नवरदेव नशेत तर्रर होऊन घरातील महिलांना अभद्र बोलू लागला होता.
- त्याचे मित्रही स्टेजवरील मुलांवर कॉमेंट करू लागले होते. नवरीने याचा विरोध केला, तेव्हा नवरदेव तिच्यावरच भडकला. त्याने स्टेजवरच तोडफोड सुरू केली. एवढ्या गोंधळानंतर नवरीने धाडसी निर्णय घेतला. तिने नवरदेवाच्या तोंडावरच त्याच्याशी लग्नाला नकार दिला.

 

काय म्हणणे होते नवरीचे?
- तेव्हा नवरी म्हणाली होती- 'स्टेजवर मी पोहोचले, तेव्हा माझ्या मैत्रिणींवर नवरदेवाच्या मित्र घाण-घाण कॉमेंट पास करत होते. अभद्र बोलत होते. त्या वेळी मी काहीच बोलले नाही. परंतु वरमालाच्या वेळी जेव्हा नवरदेव माझ्या समोर आला तेव्हा त्याच्या तोंडातून दारूचा प्रचंड वास येऊ लागला होता.'
- 'तरीही मी स्वत:ला रोखले. पण जेव्हा त्याने घरीतील महिलांवर अश्लील कॉमेंट सुरू केल्या, तेव्हा मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी स्टेजवरच ओरडून लग्नाला नकार दिला. मी जिद्दीलाच पेटले, आता काहीही होवो, या मुलाशी लग्न करणारच नाही.' 
- नवरीची आई म्हणाली होती, 'आम्हाला दारुडा जावई नकोय. तो नशेत धिंगाणा घालत होता. आमच्या मुलीचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचले.'

 

बातम्या आणखी आहेत...