आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: कोण होणार उपमुख्यमंत्री? कुमारस्वामींच्या शपथेआधी राहुल गांधींपुढे आहेत ही 4 आव्हाने Who Will Be Karnataka Deputy CM These Are Four Problems Before Rahul Gandhi

कर्नाटक: कोण होणार उपमुख्यमंत्री? कुमारस्वामींच्या शपथेआधी राहुल गांधींपुढे आहेत ही 4 आव्हाने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/बंगळुरू-  कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एच.डी. कुमारस्वामींचे नाव जाहीर झालेले आहे, परंतु उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांची नावे अजून फायनल झालेली नाहीत. यासाठी दिल्लीपासून ते बंगळुरूपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु अजूनही काहीही तोडगा निघालेला नाही.  

सोमवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिल्लीमध्ये आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठक घेतल्यानंतर जेडीएस नेते आणि भावी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासोबतही बैठक घेतली. एवढे होऊनही कुमारस्वामींच्या मंत्रिमंडळावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही.

दरम्यान, काँग्रेससमोर बुधवारी होणाऱ्या शपथग्रहण सोहळ्याच्या पूर्वी 3 प्रमुख आव्हाने तोंड वासून उभी आहेत. ही आव्हाने पक्षाध्यक्षांची डोकेदुखी म्हणून समोर आली आहेत.

 

पहिले आव्हान 

काँग्रेस नेतृत्वासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे, शपथ-ग्रहणादरम्यान त्यांची ताकद दिसावी. असे यासाठी कारण 78 आमदारांसह काँग्रेस दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे आणि ते जेडीएस (38 आमदार) पेक्षा खूपच पुढे आहेत. असे असले तरीही काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रिपद देऊ केलेले आहे. यामुळे मिशन 2019 साठी वाटचाल करणाऱ्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींना हे चित्र कितीही लोभस दिसत असले, तरीही हे वास्तव स्थानिक नेतृत्व आणि काँग्रेस आमदारांच्या गळी उतरवणे खूप कठीण ठरणार आहे.

 

दुसरे आव्हान

एका वृत्तानुसार काँग्रेसला 20 आणि जेडीएसला 14 मंत्रिपदांचा फॉर्म्युला तयार आहे, परंतु अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा झालेली नाही. अशा वेळी काँग्रेसचे 78 आमदारांपैकी मंत्रिपदाची इच्छा असणाऱ्या आमदारांना एकजूट ठेवणे काँग्रेस नेतृत्वासाठी चिंतेची बाब आहे. आजच्या मीटिंगमध्ये जर कॅबिनेटवर काही निर्णय झाला, तर उद्या (बुधवार) होणाऱ्या शपथग्रहणाआधीच ही समस्या उग्र रूप धारण करू शकते.

 

तिसरे आव्हान

उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसच्या खात्यात येण्याची शक्यता जास्त आहे. या पदासाठी काँग्रेसचे अनेक दिग्गज शर्यतीत आहेत. परंतु या रांगेत सर्वात पुढे दलित नेते जी. परेमश्वरा दिसत आहेत. अशा वेही एमबी पाटील, देशपांडे, बाहुबली म्हणून ओळख असलेले डी. के. शिवकुमार आणि शमनूर शंकरप्पा यांसारखे लिंगायत समर्थित काँग्रेसच्या बड्या नेत्यांना समजावणे एक मोठी समस्या असेल. कारण उपमुख्यमंत्री पदासाठी हेही दावेदार मानले जात आहेत. राज्यातील सर्वात मोठ्या लिंगायत समुदायाशी संबंधित एका संघटनेनेही एका लिंगायत काँग्रेस आमदाराला उपमुख्यमंत्रिपदी बसवण्याची मागणी केलेली आहे.

या सर्व आव्हानांदरम्यान आज बंगळुरूत काँग्रेस आणि जेडीएस आमदारांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांचे प्रमुख नेतेही सहभागी होतील. काँग्रेसचे कर्नाटक निवडणूक प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांच्यासह इतर काँग्रेसी नेतेही संध्याकाळी जेडीएस नेत्यांशी बैठक घेतील. येथे या सर्व आव्हानांचे निराकरण करण्याचे सर्व प्रयत्न केले जातील.

 

चौथ्या आव्हानाची भर
मुस्लिम संघटनांकडून उपमुख्यमंत्रिपद मुस्लिम आमदाराला मिळावी अशी मागणी केली जात आहे. काँग्रसेमधील रोशन बेग या मुस्लिम आमदाराचे नाव यामुळे चर्चेत आले आहे. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री राहणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता मुस्लिम संघटनांनी 7 वेळा आमदार राहिलेल्या रोशन बेग यांचे नाव पुढे केले आहे. बेग किंवा दुसऱ्या एखाद्या मुस्लिम आमदाराला उपमुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे आता काँग्रेस नेतृत्व काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण दलित, लिंगायत की मुस्लिम आमदार मुख्यमंत्री करायचा, हा पेच राहुल गांधींपुढे निर्माण झाला आहे. कुणालाही केले, तरी इतर दोन समुदायांची नाराजी होण्याची शक्यता आहे. 


काँग्रेसची सत्त्वपरीक्षा, अपयश हीच भाजपला सुवर्णसंधी
कारण अपक्ष आणि इतर पक्षांचे मिळून दोन्ही पक्षांकडे एकूण 117 जागा आहेत, ही संख्या बहुमताच्या आकड्यापेक्षा फक्त 6 ने कमी आहे. अशा वेळी 2-3 आमदारांची नाराजीही काँग्रेस-जेडीएस आघाडीला मोठा झटका ठरू शकते. आणि हाच झटका भाजपसाठी सुवर्णसंधी म्हणून समोर येऊ शकतो.  

 

बातम्या आणखी आहेत...