आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • खळबळजनक: डॉक्टर पतीला झाडाला बांधून त्याच्या डोळ्यांदेखत पत्नी अन् अल्पवयीन मुलीवर गँगरेप Wife And Minor Daughter Gangroop In Front Of Husband S Eyes

Shocking: डॉक्टर पतीला झाडाला बांधून त्याच्या डोळ्यांदेखत पत्नी अन् अल्पवयीन मुलीवर गँगरेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारच्या गया जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. - Divya Marathi
बिहारच्या गया जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली.

गया (बिहार) - गया जिल्ह्यातील सोनडीहा गावात सशस्त्र गुंडांनी एका डॉक्टरला झाडाला बांधून त्याची पत्नी आणि 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँगरेप केला. 12 नराधमांनी हे दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे. गुरारूमध्ये खासगी क्लिनिक चालवणारे डॉक्टर बुधवारी रात्री 8.00 वाजता 45 वर्षीय पत्नी आणि 13 वर्षीय मुलीसोबत बाइकवरून विश्वनाथपूर येथील घरी परतत होते. रौना-कनौसी मार्गावर त्यांची बाइक बदमाशांनी अडवली आणि लूटमार केली. यानंतर गुंडांनी डॉक्टरला झाडाला बांधले आणि त्याच्या डोळ्यांदेखत पत्नी आणि मुलीवर पाशवी गँगरेप केला. याप्रकरणी एसएसपींनी कोंच पोलिस स्टेशन इंचार्ज राजीव रंजन सिंह यांना निलंबित केले आहे.

 

20 जणांना घेतले ताब्यात, पीडितेने दोघांना ओळखले
- घटनेनंतर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परिसरातील 20 गुंडांना ताब्यात घेतले. यापैकी दोघांना डॉक्टरच्या पत्नी व मुलीने ओळखले आहे.

 

2 आरोपी सापडले - एसएसपी 
ही अतिशय गंभीर घटना असून याचा तेवढ्याच गांभीर्याने तपास सुरू आहे. संशयाच्या आधारे सोनडीहा गावातून 20 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी पीडितेने दोघांची ओळख पटवली आहे. दोन्ही आरोपींची चौकशी करून घटनेतील इतरांच्याही अटकेची कारवाई सुरू आहे.
- राजीव मिश्रा, एसएसपी, गया.

 

फास्ट ट्रॅक कोर्टातून देऊ शिक्षा: डीआयजी
पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. घटनेतील गुन्हेगारांच्या ओळख पटवण्याची तसेच अटकेची कारवाई सुरू आहे. घटनेतील आरोपींना कडक शासन कसे होईल ते पाहू. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टापुढे ठेवू.
-विनय कुमार, डीआयजी

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...