आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wife Murdered Husband Over Illicit Relation With Father In Law In Jaipur Arrested

CRIME: सुनेचे सासऱ्याशी अवैध संबंध, पतीच्या विरोधामुळे केली निर्घृण हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - आमेर परिसरात चुलत सासऱ्याशी 6 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमप्रकरणामुळे पती मुकेश सैनीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पत्नीला पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी अटक केली. आरोपी पत्नी पूजा सैनीला पोलिस बुधवारी कोर्टात सादर करणार आहेत.

 

अवैध संबंधांंना होती पतीची अाडकाठी

पोलिस अधिकारी नरेन्द्र कुमार म्हणाले की, पूजाचे मुकेशचे काका राकेशसोबत मागच्या 6 वर्षांपासून अवैध संबंध होते. यामुळे तिने पती मुकेशचा काटा काढण्याचा कट रचला. यासाठी राकेशने आपल्या अल्पवयीन पुतण्यालाही हत्येच्या कटात सहभागी केले आणि 12 जुलै रोजी संध्याकाळी 'कोरेक्स' पिण्याच्या बहाण्याने त्याला सुनसान जागेजवळ बोलावले. येथे कोरेक्स प्यायल्यानंतर धारदार शस्त्रांनी वार करून मुकेशी निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येची सूचना मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी संध्याकाळी राकेशला व त्याच्या अल्पवयीन पुतण्याला ताब्यात घेतले.

 

पोलिस आल्यावर पूजाने गिळल्या सल्फासच्या गोळ्या
पोलिसांनी दोघांनाही पकडताच पूजाने सल्फासच्या गोळ्या खाल्ल्या. तेव्हापासून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सुटी होताच पोलिसांनी तिला अटक केली. पूजाला पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्हा कबूल केला.

 

4 महिन्यांपासून सुरू होती प्लॅनिंग...

आरोपी पूजा म्हणाली, मागच्या 4 महिन्यांपासून ती व राकेश मिळून पती मुकेशचा काटा काढण्याचा प्लॅन बनवत होते. याआधी मुकेशला घरातच संपवण्यासाठी सल्फासच्या गोळ्या मागवल्या होत्या, परंतु पुन्हा पकडले जाण्याच्या भीतीने ती देऊ शकली नव्हती. त्यानंतर घराबाहेर मारण्याचा कट रचला. या कटानुसार राकेशने त्याला बहाण्याने बोलवून हत्या केली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...

 

बातम्या आणखी आहेत...