आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरदेवाने दाढी केली नाही म्हणून सासऱ्याने रोखले लग्न, म्हणाला- दाढी नाही, तर लग्नही नाही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडवा (मध्य प्रदेश) - प्रत्येक लग्नात मानापमान नाट्याचा एखादा अंक होतोच होतो. असाच एक विचित्र प्रकार घडून अजंटी गावात एका लग्नाला एक दिवस उशीर झाला. लग्न लांबण्याचे कारण होते, नवरदेवाची दाढी. नवरीच्या वडिलांनी नवरदेवाने दाढी न केल्यामुळे लग्न लावायला नकार दिला होता. त्यांनी नवरदेवाने शेव्हिंग करण्याची मागणी केली. तथापि, नवरदेवाचे वडील हरवलेले असल्याने त्याने ते सापडेपर्यंत दाढी न करण्याचा नवस केला होता. यामुळेच त्याने दाढी करायला नकार दिला. मग रात्रभर समजूत घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नविधी पार पडले. 

 

असे आहे पूर्ण प्रकरण... 
- अजंटीमध्ये सोमवारी संध्याकाळी राधेश्याम जाधव यांची मुलगी रूपालीचे लग्न होते. मंगल चौहानशी तिचे लग्न ठरले होते.
- सासरा राधेश्याम यांनी नवरदेवाची वाढलेली दाढी पाहून आक्षेप घेतला. आणि दाढी केल्यानंतरच लग्न लावण्याचा हट्ट केला.
- नवरदेव मंगलही दाढी करणारच नाही म्हणून अडून बसला. संध्याकाळी 6 वाजताचा मुहूर्त निघून गेला. रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली नाही, यामुळे वऱ्हाड परत गेले.
- वऱ्हाड गावाबाहेर रस्त्यावर आले. बुजुर्ग व नातेवाईकांनी परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून समजावण्याचा प्रयत्न केला.
- वधुपक्ष दाढी केल्यानंतरच लग्न यावर अडून बसला आणि रात्र निघून गेली. मग गावकऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले.
- त्यांनी दोन्ही बाजू ऐकून दोन्ही पक्षांची समजूत घातली, तरीही प्रकरण निवळले नाही.
- दुसऱ्या दिवशी सकाळी नवरदेव दाढी करण्यासाठी तयार झाला आणि यानंतरच लग्नविधी पार पडले.

 

वधुपक्षाचे म्हणणे- महिनाभरापूर्वी नवरदेवाची दाढी नव्हती...
- वधुपक्षाने सांगितले की, महिनाभरापूर्वी नवरदेव जेव्हा आला होता तेव्हा त्याला दाढी नव्हती.
- वऱ्हाड घेऊन आला तेव्हाच दाढी ठेवली. नवरदेव कधी असा येत नाही. शेव्हिंग करा म्हटले तर नकार दिला, यामुळेच वाद वाढला.


मंदिरात माफी मागितल्यावर केली दाढी
-नवरदेवाची समजूत घातली की, त्याने मंदिरात क्षमा मागून नवस फेडावा आणि दाढी करावी.

 

वडील बेपत्ता झाल्याने केला होता नवस
- वरपक्षाने सांगितले की, नवरदेव मंगल चौहानचे वडील रायसिंह तीन वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाले. ते परत आले नाहीत.
- यामुळे मंगलने वडील सापडेपर्यंत दाढी न करण्याचा नवस केला होता. यामुळे दाढी केली नाही. नवरदेव मंगल आणि त्याचा भाऊ दाढी केल्याविनाच वऱ्हाड घेऊन गेले होते.

 

पुढच्या स्लाइड्वर पाहा, आणखी फोटोज..

बातम्या आणखी आहेत...