आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतिची सरकारी नोकरी अन् प्रियकरासोबत राहण्याची इच्छा, महिलेने केले असे क्राइम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा (उत्तर प्रदेश)- येथे पोलिसांनी पतिच्या हत्येच्या आरोपात पत्नीला तिच्या प्रियकरासह 3 लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेने पतिची सरकारी नोकरी आणि प्रियकरासोबत राहण्याचा प्लॅन बनवला आणि पतिची हत्या केली. महिलेचा पती रेल्वेत नोकरीला होता, त्याची हत्या अशा पद्धतीने करण्यात आली की, तो अपघात वाटवा. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना जेलमध्ये पाठवले आहे.


हत्येला दिले अपघाताचे रुप, असा झाला खुलासा...
- एसपी आदित्य शुक्ला यांनी सांगितले की, मगोर्रा येथे 2 फेब्रुवारीला एक अपघात झाला होता, या रेल्वे कर्मचारी संजीवचा मृत्यू झाला होता.
- प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे वाटत होते. परंतु, चौकशी केली तेव्हा हा अपघात नसून हत्या असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
- कारमध्ये दारूच्या बाटल्या आणि एक तेलाची बाटली आढळून आली. संशयाच्या आधारे गाडीचा मालक शैलेंद्रशी विचारपूस करण्यात आली.
- शैलेंद्रने सांगितले की, त्याने हे सर्व आपला मित्र पुष्पेंद्रच्या सांगण्यावरून केले. कारण त्याचे संजीवच्या पत्नीशी संबंध होते.
- पुष्पेंद्रने माझी कार घेतली, यानंतर आम्ही सोबत दारू पिली. नंतर तेलात माती लावून नंबर प्लेटवर लावली.
- यानंतर रस्त्याच्या बाजूला उभे राहून संजीव येण्याचा वाट पाहू लागलो. जसा तो रसूलपूरकडून येताना दिसला, तसे त्याला टक्कर मारली आणि चरडून निघून गेलो. परंतु, 200 मीटर दूर जाताच गाडी बंद पडली आणि आम्ही गाडी तेथेच सोडून पळून गेलो.


रेल्वेत नोकरी आणि प्रियकरासोबत राहण्याच्या इच्छेने केली पतिची हत्या...
- पोलिसांनुसार, संजीवची पत्नी त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी नोकरी करून प्रियकर पुष्पेंद्रसोबत राहणार होती.
-  महिलेने सांगिलते की, तिचे एक वर्षांपासून पुष्पेंद्रशी संबंध होते.
- रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या संजीवच्या हत्येला अपघात दाखवून मारण्यामागे त्याच्या पत्नीचे मास्टर माइंड होते.
- आरोपी पुष्प्रेंद्रने सांगितले की, त्याला महिलेसोबत रहायचे होते. त्यामुळे तिच्या पतिला मार्गातून हटवण्याचा प्लॅन बनवला आणि अपघात घडवून त्याची हत्या केली.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटो...