आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • नवजाताचा जन्म होताच आईने हत्या करून पुरले गायीच्या शेणात, गावकऱ्यांनी केला Shocking खुलासा Woman Buries Her Newborn In Cow Dung Pit In Odisha

नवजाताचा जन्म होताच आईने हत्या करून पुरले गायीच्या शेणात, गावकऱ्यांनी केला Shocking खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिशा - मयूरभंज जिल्ह्यात एका आईद्वारे आपल्या नवजात बाळाची हत्या केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. रिपोर्ट्नुसार, आदिवासी बहुल जिल्ह्यातील धिपासाही गावात एका महिलेने आपल्या नवजात बाळाची आधी हत्या केली आणि मग त्याला गायीच्या शेणात पुरले. पोलिस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. गावातील हिंदू सिंहची पत्नी मसुरी सिंहने बुधवारी रात्री हे कृत्य केले.

पोलिसांना या घटनेची माहिती शुक्रवारी संध्याकाळी गावकऱ्यांकडून मिळाली. गावकऱ्यांना जेव्हा गायीच्या शेणातून असह्य दुर्गंधी येऊ लागली, तेव्हा त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. 
पोलिसांनी आरोपी महिलेची चौकशी केल्यावर तिने बाळाची हत्या केल्याचा आरोप फेटाळत म्हटले की, बाळ मृत जन्मले होते. तथापि, गावकऱ्यांनी तिच्यावर बाळाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. गावकऱ्यांनी महिलेवर आरोप केला की, ते बाळ महिलेच्या पतीचे नसून दुसऱ्याचेच होते व हे लपवून ठेवण्यासाठी तिने बाळाची हत्या केली. अधिक तपास पोलिस करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...