आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • सुंदर पत्नी असूनही पतीची \'ही\' होती तक्रार Woman Killed For Dowry Is Daughter In Law Of Uttar Pradesh Police Officer

सुंदर पत्नी असूनही पतीची \'ही\' होती तक्रार, मग रूममध्ये आढळली डेडबॉडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत हिमानी. लग्नाला 5 वर्षे होऊनही सासरच्यांनी कार आणि पैशांची मागणी केली. - Divya Marathi
मृत हिमानी. लग्नाला 5 वर्षे होऊनही सासरच्यांनी कार आणि पैशांची मागणी केली.

हापुड - उत्तर प्रदेशच्या हापुडमध्ये एका विवाहितेचा हुंड्यापायी जीव गेला. येथे विवाहितेच्या माहेरच्यांनी तिच्या पतीसहित 5 जणांवर हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप ठेवला आहे. आरोपी पती फौजदाराचा मुलगा आहे. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी डेडबॉडइी जप्त केली आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आहे. सर्व आरोपी फरार झाले आहेत आणि पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

 

लग्नाच्या 5 वर्षांनी मागत होते कार
- हापुड जिल्ह्याच्या बाबूगढ़ परिसरातील शेखपूर गावचा रहिवासी अश्विनीचे लग्न नोव्हेंबर 2013 मध्ये हिमानीशी झाले होते.
- मृत हिमानीचे वडील सतवीर सिंह म्हणाले, \"आम्ही आमच्या कुवतीप्रमाणे कन्यादान-हुंडा दिला होता. परंतु वरपक्षाची मंडळी समाधानी नव्हती. जावई अश्विनी नेहमीच आमच्या घरी येऊन पैशांची मागणी करायचा. पैशांमुळे तो माझ्या मुलीला मारहाणही करायचा.\"
- \"मागच्या महिन्यात हिमानीने आम्हाला फोन करून सांगितले की, तिचे सासू-सासरे 1 लाख रुपये आणि कारची मागणी करत आहेत. मी घरातील असतील-नसतील तेवढे पैसे गोळा करून कसेबसे 1 लाख रुपये त्यांना नेऊन दिले. पण कार घेऊ शकलो नाही. मी त्यांना कारसाठी वेळ मागितला होता, पण या सैतानांनी माझ्या काळजाचा तुकडा कायमचा दूर केला.\"

 

मग मृत आढळली मुलगी
- मृत हिमानीचा भाऊ संदीप सिंह म्हणाला, \"पप्पांनी त्या लोकांना एक लाख रुपये दिले होते. त्यानंतर बहिणीचे फोन येणे बंद झाले. वडील काळजीत होते. मागच्या 17 एप्रिलला ती माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाला आली होती. परंतु 19 एप्रिलला तिचा पती तिला परत घेऊन गेला. मग शुक्रवारी अश्विनीच्या गावातून फोन आला की, हिमानीचे पोट दुखत आहे. पप्पांनी तिच्याशी बोलणे करून द्या म्हणाले तर ती बोलण्याच्या स्थितीत नाही असे सांगण्यात आले. आम्ही जेव्हा तेथे पोहोचलो, तोपर्यंत बहिणीचा मृत्यू झालेला होता. अश्विनी म्हणाला की, तुझ्या बहिणीने फॉस्फोरस गिळले आहे, पण तिच्या शरीरावर विषप्राशनाचा कोणताही परिणाम दिसला नव्हता. असे झाले असते, तर तिचे शरीर काळे-निळे झाले असते. आम्हाला पूर्ण खात्री आहे की, तिचा पती आणि सासऱ्याने मिळून तिला ठार केले आहे.\"

 

पोलिस स्टेशनमधून धमकी
- मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी पती अश्विनीसहित 5 जणांवर हुंड्यासाठी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अश्विनीचे वडील हरेंद्र सिंह आग्राच्या एका पोलिस स्टेशनमध्ये फौजदार आहेत. संदीप सिंह म्हणाला, आग्राच्या त्या पोलिस स्टेशनमधून फोनवर कोणतीही कारवाई न करण्याची धमकीही देण्यात आली आहे.
- संदीप म्हणाला, \"हिमानीच्या मृत्यूची सूचना तिच्या सासरच्यांनी दिली नाही. तेथील इतर गावकऱ्यांनी फोन करून बोलावले होते. बहिणीच्या सासरचे गुपचूप तिचे अंत्यसंस्कार उरकणार होते. आम्ही तेथे पोहोचताच ते सर्व फरार झाले.\"


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...