आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: पतीची हत्या करून घरातच पुरली डेडबॉडी, कबरीवर प्रियकरासोबत आठवडभर झोपली पत्नी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गया (बिहार) - येथे विवाहितेने पतीची हत्या केली. मृतदेह आपल्या रूममध्ये पुरला. मग त्या जागेवर खाट टाकून प्रियकरासोबत आठवडाभर आरामात झोपत राहिली. परंतु मृतदेह जास्त खोल पुरलेला नसल्याने प्रचंड दुर्गंधी सुटली आणि या खुनाला वाचा फुटली. ही धक्कादायक घटना बिहारच्या गया जिल्ह्यातील हाहेसाडी गावातील आहे. याप्रकरणी मृताच्या पुतण्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 

खून लपवण्यासाठी सरपंचालाही दाखवले पैशांचे आमिष...
- सूत्रांनुसार, जमुनी देवीने आठवडाभरापूर्वी पतीची हत्या केली होती. यानंतर मृतदेह तिने रूममध्येच दफन करून त्यावर खाट टाकून प्रियकरासोबत आरामात झोपत राहिली. परंतु 5-6 दिवस उलटल्यानंतर रूममधून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. पकडले जाण्याच्या भीतीने तिने सरपंचाला मदत मागितली.
- सरपंच देवती देवीला ती म्हणाली,  मी पतीला विष खाऊ घालून मारले आणि घरातच खड्डा खोदून पुरले आहे. परंतु तुमची इच्छा असल्यास हे प्रकरण झाकून ठेवू शकता. मी यासाठी पैसेही द्यायला तयार आहे. परंतु, सरपंचांनी तिला बहाण्याने बसवून ठेवले आणि पोलिसांना बोलावले.

- आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या मते, प्राथमिकदृष्ट्या गळा दाबून आणि प्रायव्हेट पार्टवर वार करून हत्या केल्याचे दिसत आहे.

 

पुरावे मिटवण्यासाठी मृतदेहावर टाकल्या विटा
- मृत पतीचा पुतण्या महेंद्रने सांगितले की, आठवड्याभरापूर्वी काकासोबत जेवणाचा बेत ठरला होता. त्यानंतर ते बेपत्ताच झाले. त्याने आरोप केला की, जमुनीने प्रियकरासोबत मिळून काकाची हत्या केली आणि मृतदेह घरात पुरून त्यावर प्रियकरासोबत आरामात झोपून राहिली.  पुरावे मिटवण्यासाठी तिने मृतदेहावर विटासुद्धा अंथरल्या होत्या. 

 

पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी जमुनी देवीला अटक केली असून एकूण 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

 

 

बातम्या आणखी आहेत...