आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणिक सरकार यांच्या बंगल्यात सापडला होता महिलेचा सापळा, नव्या CM ने करावी चौकशी- देवधर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यावर संघाचे नेते देवधर यांनी आरोप केला आहे. - Divya Marathi
त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यावर संघाचे नेते देवधर यांनी आरोप केला आहे.

अगरतळा - त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुनील देवधर यांनी माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री सरकार यांच्या निवासस्थानातील सेप्टिक टँकमधून एका महिलाचा सापळा निघाला होता. देवधर यांचा दावा आहे की ही एक राजकीय हत्या होती. जाणिवपूर्वक हे प्रकरण गुंडाळण्यात आले होते. देवधर यांनी नवे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्याकडे मागणी केली आहे की सर्व मंत्र्यांना सरकारी बंगले वितरीत करण्यापूर्वी त्यांच्या टँकची तपासणी आणि स्वच्छता करुन घ्यावी. त्रिपुरामध्ये भाजप आघाडीने 43 जागा जिंकत 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्यांना बाहेर केले आहे. 

 

जानेवारी 2005 मध्ये सापडला होता सांगाडा 
- सुनील देवधर यांनी ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे, 'त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांना मी विनंती केली आहे की सर्व मंत्र्यांना सरकारी निवास्थानांचे वितरण करण्यापूर्वी निवासस्थानात असलेल्या सेप्टिक टँकची स्वच्छता करुन घ्यावी. कारण 25 वर्षे सीपीएम सरकारचे मंत्री तिथे राहात होते. स्वतः माणिक सरकार यांच्या निवासस्थानातील सेप्टिक टँकमध्ये 4 जानेवारी 2005 रोजी एका महिलेचा सापळा सापडला होता. हे प्रकरण जाणिवपूर्वक दाबण्यात आले होते.'

 

कोण आहे सुनील देवधर? 
- सुनील देवधर हे त्रिपुराचे प्रभारी आहेत. 2014 मध्ये अमित शहांनी त्यांना त्रिपुरात पाठवले होते. डाव्यांची 25 वर्षांची सत्ता उलथवून लावण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. 
- 52 वर्षांचे देवधर हे मुळचे महाराष्ट्रातील आहेत. ते नॉर्थ इस्ट भागात संघाचे तीन वर्ष प्रचारक राहिले आहेत. 1985 मध्ये ते संघाशी जोडले गेले. 
- त्रिपुरातील प्रचारा दरम्यान अनेक ठिकाणी त्यांनी शाखा सुरु केल्या. नॉर्थ इस्टच्या नागरिकांना देशाच्या इतर भागाशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या मनात देशाभिमान निर्माण करण्यासाठी त्यांनी 'माय होम इंडिया' नावाने एनजीओ सुरु केले आहे. या माध्यमातून त्यांनी पूर्वोत्तर राज्यांमध्ये भाजपचे बस्तान बसवले. 
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील देवधर हे नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसीमध्ये प्रचार प्रमुख होते.

बातम्या आणखी आहेत...