आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला वकील- अकाउंटंट यांच्यात कोर्टाबाहेर फ्री-स्टाइल हाणामारी; आधी केस उपटले, नंतर खाली पाडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅड. पुष्पा पवार आणि अकाऊंटंट विजयलक्ष्मी यांच्यात फ्रि-स्टाइल झाली. - Divya Marathi
अॅड. पुष्पा पवार आणि अकाऊंटंट विजयलक्ष्मी यांच्यात फ्रि-स्टाइल झाली.

आजमेर (राजस्थान) - येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दोन महिला वकिलांमध्ये फ्री-स्टाइल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बुधवारी दुपारी अॅड. पुष्पा पवार आणि मुंशी विजयलक्ष्मी यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर दोघी एकमेकींवर तुटून पडल्या. महिला वकिलांनी एकमेकींचे केस पकडत रस्त्यावर लोळण घेत मारामारी केली. 

सहकारी वकील आणि नागरिकांनी दोन्ही महिला वकिलांना सोडवण्याचे प्रयत्न केले. पुष्पा पवार आणि विजयलक्ष्मी यांनी मात्र तब्बल 10-12 मिनिट भर रस्त्यावर फ्री-स्टाइल केली.

 

यामुळे झाला वाद.. 
- एडीएम ऑफिस बाहेर वकिलांचे टेबल लावण्यावरुन दोघी महिला वकिलांमध्ये आधीपासून वाद होता. 
- बुधवारी वकील पुष्पा यांनी विजयलक्ष्मी यांच्यावर मोबाइल तोडल्याचा आरोप केला. त्यानंतर दोघींमध्ये हाणामारी सुरु झाली. 

 

 पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न 
 - हाणामारीनंतर अकाऊंटंट विजयलक्ष्मी यांनी परिसरातील पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी कमी असल्यामुळे सुदैवाने काही विपरीत घडले नाही. 
 - दोन्ही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याची कारवाई केली. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, वकील आणि अकाऊंटंट यांची फ्री-स्टाइल हाणामारी...

बातम्या आणखी आहेत...