आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने जेवणात वाढली करपलेली चपाती, पतीने दिला तीन तलाक; ऐकली नाही म्हणून सिगारेटचे चटके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महोबा (यूपी) - जिल्ह्यात क्षुल्लक कारणावरून तीन तलाक दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला फक्त यासाठी तलाक दिला, कारण तिने थोडीशी करपलेली चपाती वाढली होती. ही घटना पथरोवा गावातील आहे. पोलिस स्टेशनमध्ये पोहोचून पत्नीने जेव्हा तक्रार केली, तेव्हा घटना उजेडात आली.

- 24 वर्षीय रजिया म्हणाली, 4 जुलै 2017 रोजी निहाल खांशी तिचे लग्न झाले होते. आरोप आहे की दुसऱ्या दिवसापासून तिला टॉर्चर करणे सुरू झाले होते.
- पीडिता म्हणाली, तीन दिवसांपूर्वी तिने पतीला रात्री जेवण वाढले होते. चपाती थोडी करपलेली होती. यावर त्याने अपशब्द बोलायला सुरुवात केली. एवढेच नाही, तीन वेळा तलाक म्हणत घरातून निघून जा म्हणाला.
- आरोप आहे की, रजियाने जेव्हा घर सोडायला नकार दिला, तेव्हा तिला सिगारेटचे चटके देऊन टॉर्चर करण्यात आले.
- एएसपी बंशराज यादव म्हणाले, महिलेच्या तक्रारीवरून प्रकरण दाखल करण्यात आले आहे. तथापि, गतवर्षी 22 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने 3 तलाकला चुकीचे ठरवत याला संविधानाच्या अनुच्छेद 14 चे हनन असल्याचे सांगितले होते.

 

जेव्हा चिवड्याच्या पाकिटामुळे झाला होता तलाक
- मे 2017 मध्ये गाजियाबादच्या लोनीतील रहिवासी सलीमने पत्नी उम्मेदाला फक्त यासाठी तलाक दिला, कारण तिने आपल्या माहेरी एक चिवड्याचे पाकीट पाठवले होते. घटनेच्या दिवशी सलीमने बाजारातून चिवड्याची दोन पाकिटे आणली होती. त्यापैकी एक उम्मेदाने आपल्या आईच्या घरी नेऊन दिले होते. यावर पती एवढा चिडला की, त्याने पत्नीला मारझोड सुरू केली.
- त्याचे म्हणणे होते की, ती त्याच्या मनाविरुद्ध चिवड्याचे पाकीट माहेर का द्यायला गेली. उम्मेदा म्हणाली की, या क्षुल्लक कारणावरून सलीमने तिला तीन वेळा तलाक म्हणत घराबाहेर काढले.

 

 

बातम्या आणखी आहेत...