आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गावातील लोकांना आजही माहित नाही टॉयलेट, महिला-पूरूष शौचास जातात उघड्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीतापूर- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घरोघरी सौचालय असल्याचे स्वप्न पाहत आहे. गावातील महिलांनी उघड्यावर सौचालयास जाऊ नये, यासाठी त्यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. एवढे असताना देकील सीतापूर येथील एक गाव असे आहे, जिथे राहणाऱ्या लोकांना शौचालय नेमके काय असते हेच माहित नाही. आजही येथील महिला आणि पूरूष शेतात उघड्यावर शौचास जातात. असे सांगण्यात येते की, येथील अनेक लोकांना अद्याप शौचालय पाहिलेलेच नाही.


कधीच पाहिले नाही शौचालय...
> प्रकरण सीतापूर येथून 30 किमी दूर पासिवा गटातील पुल्हारिया गावातील आहे. या गावात जवळापास 130 घर आहेत. येथील लोकसंख्या 1326 आहे. यात 900 दलित समाजातील लोक आहेत.
> एवढी लोकसंख्या असताना देखील या गावात आजपर्यंत एकही टॉयलेट बांधण्यात आलेले नाही. येथील महिला आणि पूरूषी आजही उघड्यावर शौचास जातात. महिलांसोबत काही घटना घडू नये, म्हणून महिला ग्रुपने शौचास जातात.
> महिलांनी सांगितले की, त्यांनी आजपर्यंत शौचालय कसे असते हेच पाहिलेले नाही. एवढेच नाही तर येथील अनेक महिलांना देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे नाव देखील माहित नाही.
> लोकांनी सांगितले की, शौचालय नसल्याने त्यांना लवकर लग्नासाठी जोडितचार देखील मिळत नाही. अनेक वेळा तर लग्न जमून देखील मोडले आहे.


काय म्हणतात गावाकरी...
> गावातील एक वृद्ध माजी सरपंच शिव चरण यांनी सांगितले की, मी 20 वर्षांपूर्वी माझ्या कार्यकाळात महिलांसाठी चार भींती असलेले विटांचे एक छोटेसे सार्वजणीकत शौचालय स्वखर्चातून बनवले होते, जे 15 वर्षांपूर्वीच पुर्णपणे तूटले.
> आता तेथे जंगल आहे. त्यानंतर येथे कधीच कोणत्याच सरकारी योजनेचा लाभ मिळाला नाही आणि कुठलेही शौचालय बांधण्यात आले नाही.
> तसेच आणखी एक माजी सरपंच राम सागर यांनी सांगितले की, माझ्या कार्यकाळात पैसे तर आले होते, परंतु, ते दुसऱ्या ग्रामसभेत ट्रान्सफर करण्यात आले. खुप प्रयत्न केले, पण काहीच झाले नाही.
> जवळपास 50 वर्ष झाले, या गावात शौचालयाचा चेहरा कोणीच पाहिला नाही आणि गावाच कुठलाच विकास देखील झाला नाही. पुरूष आणि महिला शौचासाठी आजही उघड्यावर शेतात जातात.


काय म्हणतात अधिकारी...
सीतापूरचे मुख्य विकास अधिकारी देव कृष्ण तिवारी (CDO) यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व गावात शौचालय बनवण्यात येत आहेत. लवकर लक्ष्य पूर्ण होईल. त्यांना पल्हारिया गावाविषयी सांगितले तेव्हा ते चकित झाले. त्यांनी तत्काळा एक टीम पाठवून चौकशी नंतर विकास करू असे सांगितले आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...