आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबयाना/भरतपूर- रायकीय प्राथमीक विद्यालय निठार येथे कार्यरत स्वयंपाकी महिलेची शुक्रवारी दुपारी हत्या करण्यात आली. दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान एका तरूणाने धारदार हत्याराने महिलेच्या डोक्यावर आणि गळ्यावर वार करून तिची हत्या केली. महिलेसोबत आरोपीचे प्रेमसंबंध होते, काही वेळा पूर्वी महिलेने दुसऱ्या एका तरूणासोबत संबंध बनवले होते असे सांगण्यात येत आहे आणि यावरून दोघांमध्ये वाद देखील झाला होता.
असे आहे संपूर्ण प्रकरण...
- प्रेमसंबंध तोडण्यासाठी नाराज प्रियकर शाळेच्या स्वयंपाक घरात घुसला आणि महिलेची हत्या केली.
- मृत महिला राधा (30)च्या पतिचा मृत्यू चार वर्षांपूर्वीच झाला होता. चार मुलांचे पोलनपोषन करण्यासाठी ती शाळेत स्वयंपाकीनचे काम करत होते.
- तिचे बुद्धिवान (28) ठाकुर याच्यासोबत प्रेमसंबंध तुटल्यामुळे वाद सुरू होता. शुक्रवारी दुपारी साडे 12 वाजेच्या दरम्यान बुद्धिवान शाळेत पोहोचला आणि राधाकडे जेवण मागितले.
- बुद्धिवानचा राग पाहून राधा गेट बंद करू लागली. परंतु, बुद्धिमानने गेटवर लाथ मारली आणि शर्टमध्ये लपवलेला चाकू कढून राधाच्या गळ्यावर आणि डोक्यावर वार करून तिची हत्या केली. यानंतर तो डायनला मारून टाकले असे जोर-जोरात ओरडत बाहेर आला. आवाज ऐकून शिक्षक बाहेर आले तेव्हा या घटनेविषयी कळाले.
हाकिम देखील चुकिचे काम करण्याच्या प्रयत्नात होता...
हत्येची तक्रार कुजीलाल पुजारी याने दाखल केली आहे. यात बुद्धिवान आणि शाळेतीलच एका शिक्षकावर आरोप करण्यात आले आहेत. असे देखील सांगण्यायत आले आहे की, बुद्धिवान हत्येनंतर बाहेर येताना म्हणाला होता की, मी जात आहे, परंतु हिने मला सोडून दुसऱ्यावर प्रेम केले. तिने शाळेतील एका शिक्षकावर प्रेम केले, हीच तिची चूक होती.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.