आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात दुसरा सर्वात जास्त GST रेट भारतात, वर्ल्ड बँकेने केली सरकारची पोलखोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - तुम्हाला माहितीये का, जीएसटीच्या नावावर भारतीयांकडून सर्वात जास्त टॅक्स वसूल केला जात आहे. आता आठवा, गतवर्षातील जुलैमध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान मोदींनी जीएसटी लाँच करताना काय म्हटले होते?  

ते म्हणाले होते की, भारताच्या गुंतागुंतीच्या टॅक्स व्यवस्थेचे हे सर्वात सरल रूप आहे. ही नवी टॅक्स क्रांती आहे. परंतु आजही सामान्य माणसाला जीएसटीबाबत काहीही माहिती नाही. आता वर्ल्ड बँकेच्या एका नव्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारताचा जीएसटी रेट जगातील दुसरा सर्वात जास्त रेट आहे. रिपोर्टमध्ये 115 देशांच्या जीएसटीची तुलना भारताशी करण्यात आली होती. दुसरीकडे, वर्ल्ड बँकेचे असेही म्हणणे आहे की, भारतीय व्यवस्थेने याला आणखी जटील बनवले आहे. 14 मार्चला ‘इंडिया डेव्हलपमेंट अपडेट’च्या सहामाही अहवालात असे सांगण्यात आले आहे.

 

काय आहे भारताच्या टॅक्स स्लॅबची कहाणी?
- भारताने 1 जुलै 2017 रोजी अंमलात आणलेल्या जीएसटीच्या ढाच्यात 5 स्लॅब 0, 5%, 12%, 18%, and 28% असे बनवले आहेत. सर्व वस्तू आणि सेवा याच्या परिघात येतात.
- तथापि, सरकारने अनेक वस्तू आणि सेवांना याच्याबाहेरही ठेवले आहे. याशिवाय काहींवर खूप कमी टॅक्स लावले आहेत.
- सोन्यावर 3% तर महागड्या माणिकांवर 0.25% च्या रेटने टॅक्स लावला आहे.
- दुसरीकडे, अल्कोहोल, पेट्रोलियम प्रॉडक्ट, रिअल इस्टेटवर लागणारी स्टॅम्प ड्यूटी आणि वीज बिलाला याच्या बाहेर ठेवण्यात आले आहे.


पाकिस्तान आणि घानासारखी परिस्थिती
- 115 देशांपैकी 49 देशांमध्ये 1 टॅक्स स्लॅब आणि 28 देशांमध्ये 2 स्लॅब आहेत. तिथेच, भारताचा अशा देशांमध्ये समावेश आहे, जेथे 5 स्लॅब आहेत. 
- भारताशिवाय या यादीत इटली, लक्झेम्बर्ग, पाकिस्तान आणि घाना सारखे देश आहेत.
- उल्लेखनीय बाब म्हणजे, भारताला सोडून सध्याच्या काळात चारही देशांची अर्थव्यवस्था खालावलेली आहे. 

 

रिपोर्टमध्ये काय म्हटले वर्ल्ड बँकेने
- भारतात टॅक्स रिफंडची गती धीमी आहे. याचा परिणाम भांडवलाच्या उपलब्धतेवर होऊ शकतो.
- रिपोर्टमध्ये टॅक्स प्रणालीच्या तरतुदींना अमलात आणण्यासाठी होणाऱ्या खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
- तथापि, भारताचे आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले संबंध असल्याने भविष्यात स्थिती सुधारू शकते.
- भारताने टॅक्स रेटची संख्या कमी केली पाहिजे. कायदेशीर तरतुदी आणि प्रॉसेसला सरल बनवले पाहिजे.

 

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, काय आहे जीएसटी, का लागू करण्यात आली? जाणून घ्या.. जीएसटीशी निगडित महत्त्वाच्या गोष्टी... 

बातम्या आणखी आहेत...