आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • जगातील सर्वात उंच पोलिस, उंची तब्बल 7 फूट 6 इंच; वजन 190 किलो, 19 नंबरचा घालतात बूट Worlds Longest Policeman

जगातील सर्वात उंच पोलिस, तब्बल 7 फूट 6 इंच उंची; वजन 190 किलो, 19 नंबरचा घालतात बूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> आपल्या उंचीमुळे ते खूप खुश आहेत.
> पत्नी म्हणते, माझे पती सर्वात उंच पोलिसवाले आहेत, हे ऐकून मला खूप आनंद होतो.

 

अमृतसर - सात फूट 6 इंच उंचीचे जगदीप सिंग हे फक्त भारतातीलच नाही, तर जगातील सर्वात उंच पोलिस कर्मचारी आहेत. अमृतसरमध्ये जन्मलेले जगदीप मागच्या 18 वर्षांपासून पंजाब पोलिसांत कार्यरत आहेत. एखाद्या सेलिब्रिटीसारखा त्यांना सन्मान मिळतो. 19 नंबरचे बूट घालणारे जगदीप यांचे वजन 190 किलो आहे आणि उंची डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर दिलीपसिंह राणा ऊर्फ द ग्रेट खलीपेक्षाही 5 इंचांनी जास्त आहे.

- जेव्हाही जगदीप घरातून बाहेर निघतात तेव्हा लोक त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आग्रह करायला लागतात. आपल्या उंचीमुळे त्यांना स्पेशल युनिफॉर्म शिवून घ्यावा लागतो.
- पंजाब आर्म्ड पोलिस (पीएपी) मध्ये कार्यरत जगदीप यांना जगातील सर्वात उंच पोलिस असल्याचा अभिमान आहे.
- त्यांच्याआधी हा किताव हरियाणाच्या 7 फूट 4 इंच उंच राजेश यांच्याकडे होता.

 

आपल्या साइजचे कपडे खरेदी करू शकत नाहीत
- 35 वर्षीय जगदीप सांगतात, मला सर्वात उंच पोलिस असल्याचा अभिमान आहे, पण दैनंदिन जीवनात बऱ्याच अडचणीही येतात.
- मी माझ्या साइज कपडे मार्केटमधून खरेदी करू शकत नाही. जेव्हाही बाहेर कुठे जातो, तेव्हा बेडवर झोपण्याची आणि बाथरूमचा वापर करण्याची अडचण होते.
- मला आठवते, जेव्हा माझ्या लग्नाची बोलणी सुरू होती. तेव्हा मुलगी शोधताना खूप अडचणी आल्या, परंतु मला माझी आयुष्याची जोडीदार मिळाली. ती 5 फूट 11 इंच उंचीची आहे.

 

सेलिब्रिटीसारखा मिळतो सन्मान
- जगदीप यांच्या पत्नी सुखबीर म्हणतात, मला हे जाणून खूप आनंद होतो की, माझे पती जगातील सर्वात उंच पोलिस आहेत.
- जेथेही मी त्यांच्यासोबत जाते, नेहमी सेलिब्रिटीसारखा सन्मान आम्हाला मिळतो. त्यांच्या आई गुरशिंदर सांगतात की, जगदीप जन्मापासूनच इतरांपेक्षा वेगळा होता.
- अनेक जण त्याला चिडवतही होते, परंतु त्याने कधीही वाईट वाटून घेतले नाही. आपल्या उंचीमुळे तो खूप खुश आहे आणि त्याच्या आनंदातच आमचा आनंद आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, जगातील सर्व उंच पोलिस जगदीप यांचे आणखी Photos...

बातम्या आणखी आहेत...