आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोदींवर नाराज आहे जगातील सर्वात कमी उंचीची ही महिला, 2019 मध्ये लढणार लोकसभा Worlds Shortest Women Jyoti Amge Will Fight In 2019 Parliament Elections

मोदींवर नाराज आहे जगातील सर्वात कमी उंचीची ही महिला, 2019 मध्ये लढणार लोकसभा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रतलाम - जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या कारभारावर नाराज आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना मोदींकडून खूप अपेक्षा होती, परंतु ती पूर्ण झाली नाही. त्या म्हणाल्या, आपली व्यवस्था मुलींच्या सुरक्षिततेसाठी काम करत नाही. मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी होईल की नाही, यातही संभ्रम आहे.

- मुलींची सुरक्षा व सिस्टिम सुधारण्यासाठी त्यांचे म्हणणे जगासमोर यावे यासाठी ज्योतीने 2019 मध्ये नागपुरातून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

- 24 वर्षीय आणि फक्त 24 इंच (61.95 सेँमी) उंचीच्या ज्योती आमगे शुक्रवारी रतलामच्या श्री साई सेवा समिती ट्रस्टच्या टॅलेंट शोमध्ये सहभागी होण्यासाठी आल्या होत्या.

- त्या दैनिक भास्कर कार्यालयातही आल्या. त्यांच्या सोबत वडील किशननारायण, आई रंजना आमगे व आयोजक रूबी शर्माही होत्या. भास्करशी चर्चेदरम्यान त्यांनी सविस्तर आपले मत मांडले.

 

दु:खद आहे, आपली सिस्टिम मुलींसाठी काम करत नाही...

 

देशात होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांवर तुमची काय प्रतिक्रिया आहे?
- अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लहान मुले-मुलीही यातून सुटले नाहीत. याविरुद्ध पूर्ण ताकदीने आवाज उठलला पाहिजे. दु:खद आहे, की आपली सिस्टिम मुलींसाठी काम करत नाही. कठुआची न्यूज पाहून खूप वाईट वाटले. तसेच दोषींना जेव्हा शिक्षा होत नाही, तेव्हा संताप होतो.

 

तुमच्या बोलण्यावरून वाटते, तुम्ही मोदी सरकारवर नाराज आहात?
- हो, हे खरे आहे. देशात कौशल्य आहे, परंतु त्यासाठी सरकार काहीही करत नाही. मलाच पाहा, कोणतीही सिक्युरिटी नाही. अनेकदा रस्त्यांवरून चालणे अवघड होऊन बसते.

 

तुमची राजकारणात चांगली ओळख आहे, नेत्यांनी तुमच्यासाठी काय केले?
- हो, राजकारणाशी संबंधित बहुतांश लोक मला ओळखतात, परंतु कुणीच काही केले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्याच शहरातील आहेत. नितीन गडकरीही नागपुराजवळ राहतात. आम्ही केंद्रापासून ते राज्यापर्यँत सर्वांना अडचणी सांगितल्या, परंतु काहीही झाले नाही.

 

देशातील व्यवस्थेवर तुम्ही काय सांगू इच्छिता?
- अनेक कायद्यांमध्ये बदल गरजेचा आहे. भोपाळमध्ये कसाबविरुद्ध साक्ष देणाऱ्या मुलीला भेटले. तिला अजूनही धोका आहे, परंतु तिला कोणतीही सिक्युरिटी नाही. विदेशामध्ये सिस्टिम जास्त मजबूत आहे, तेथे लगेच कारवाई होते.

 

तुम्ही निवडणूक लढणार का? कोणत्या पक्षाकडून?
- हो, 2019 मध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मी नागपुरातून निवडणूक लढणार आहे. मी सर्व पक्षांसाठी काम केले, परंतु आता कोणाचाही पाठिंबा घेणार नाही, देणारही नाही. मी स्वतंत्र लढणार.


जनतेचा सपोर्ट मिळेल का, तुम्हाला काय वाटते?
- सध्या तरी सर्वांचा चांगला सपोर्ट मिळत आहे. आमचे मुद्दे कायद्यात बदल, मुलींसाठी सुरक्षा, चांगले शिक्षण आणि रोजगार हे राहतील. यामुळे पुढेही सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे.

 

तुम्ही तुमच्या यशाचे श्रेय कुणाला द्याल?
- सगळे श्रेय कुटुंबालाच देते. ते नसते तर मी एवढ्या उंचीवर गेले नसते. ते कायम माझ्यासोबत राहतात. माझ्यासारख्यांनी नेहमी पुढेच जावे, स्वत:ला कमजोर समजू नये. आपण काहीही करू शकतो, कारण कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

 

हेही म्हणाल्या...

स्वप्न : अॅक्ट्रेस बनायचे होते, जे आता बनले आहे.
लग्न : मी सलमानची फॅन आहे. लग्न करायचे नाही. प्रसिद्ध व्यक्तींनी लग्न केले तर कसे चालेल? प्रसिद्ध व्यक्ती लग्न करत नाहीत. सलमाननेही केले नाही. (हसतच..)
सल्ला : तरुणांना सांगू इच्छिते की, कुणावरही कॉमेंट पास करू नये. लोक शोदरम्यान माझ्यावर कॉमेंट करतात, ज्याचे मी जागेवरच प्रत्युत्तर देते.
जेवण : शाकाहारी पसंत आहे. वरण-भात, पनीरची भाजी, चायनीजही आवडते.
खेळ : कोणत्याही खेळाची आवड नाही, पण जेव्हा क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी सगळ्यांना फटकेबाजी करताना दिसतो, तेव्हा खूप चांगले वाटते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, ज्योती आमगे यांचे आणखी काही फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...