आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: 24 तासांतच जाऊ शकते मुख्यमंत्री येद्दियुरप्पांची खुर्ची, सुप्रीम कोर्टाने मागित \'समर्थन पत्र\' Yeddyurappa Could Loose Cm Post In 24 Hours They Have To Prove In Supreme Court Tommorrow

24 तासांतच जाऊ शकते मुख्यमंत्री येद्दियुरप्पांची खुर्ची, सुप्रीम कोर्टाने मागितले \'समर्थन पत्र\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/बंगळुरू -  कर्नाटकात बी.एस. येदियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथग्रहणाला रोखण्यासाठी काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. इतिहासात दुसऱ्यांदा अर्ध्या रात्री सुप्रीम कोर्टात तब्बल साडे तीन तास सुनावणी चालली. पहाटे 4.20 वाजता सुप्रीम कोर्टाने राज्यपालांच्या निर्णयास स्थगिती द्यायला नकार दिला आणि येद्दियुरप्पांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला. येद्दींनी सकाळी 9 वाजता राज्यपाल वजुभाई वाला यांच्या उपस्थितीत राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

 

सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

परंतु, 24 तासांच्या आत आमदारांची यादी कोर्टात द्यावी. भाजपसाठी 112 आमदारांची यादी सोपवणे सोपे नसेल. अशा वेळी येदियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करणे एक मोठे आव्हान आहे.

तथापि, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 222 जागांवर आलेल्या निकालांमध्ये भाजपला 104 जागा मिळाल्या आहेत. त्यांना बहुमतापेक्षा 8 आमदार कमी आहेत. काँग्रेसला 78 आणि जेडीएसला 37, बसपला 1 आणि इतर 2 आमदार मिळाले आहेत. अशा वेही भाजप भलेही सर्वात मोठा पक्ष बनून समोर आला असेल, परंतु बहुमतापासून ते दूर आहेत. तथापि, काँग्रेस आणि जेडीएस यांनी निकाल आल्यानंतर हातमिळवणी केली आहे.

 

कर्नाटकात नाट्यमय घडामोडी

भाजपने जेथे सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेचा दावा केला, तेथेच जेडीएस आणि काँग्रेसने आघाडी करून आमदारांची पर्याप्त संख्या असण्याचा दावा करून, सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. यानंतर बुधवारी संध्याकाळी कर्नाटकचे राज्‍यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आणि येदियुरप्पा यांना 15 दिवसांत बहुमत सिद्ध करण्याची वेळ दिली. येदियुरप्‍पा यांनी गुरुवारी सकाळी 9 वाजता ठरलेल्या वेळी  मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

 

इतिहासात दुसऱ्यांदा अर्ध्या रात्री बसले सुप्रीम कोर्ट

राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर येदियुरप्पा यांचे शपथग्रहण रोखण्यासाठी काँग्रेसने बुधवारी रात्रीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टात तब्बल साडेतीन तास वाद-चर्चा झाली. यानंतर सुप्रीम कोर्टाने कर्नाटक भाजपला काही काळासाठी का असेना मोठा दिलासा दिला आहे आणि येद्दियुरप्प्पांच्या शपथग्रहणाला रोख लावण्यास नकार दिला. 

तथापि, कोर्टाच्या निर्णयाने येदियुरप्पा यांच्या मार्गात एक मोठी अडचण जरूर झाली. सुप्रीम कोर्टाने भाजपला राज्यपालांना दिलेल्या समर्थन पत्राची मागणी केली आहे. याप्रकरणी आता शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता दुसऱ्यांदा सुनावणी होईल. अशा वेळी येदियुरप्पा यांनी आपल्या 112 आमदारांची यादी सोपवली आहे. परंतु त्यांच्याकडे 104 आमदार आहेत, या परिस्थितीत 8 आमदारांचे समर्थन मिळवणे एक मोठा प्रश्न ठरला आहे.

 

आता भाजपपुढे यक्ष-प्रश्न

भाजपला शुक्रवारी सकाळी 10.30  वाजता आपल्या 112 आमदारांची यादी सोपवावी लागणार आहे, तसे झाले नाही तर येद्दियुरप्पांसमोर मोठी अडचण उभी राहील. भाजपला बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा आकडा पूर्ण करण्यासाठी जर दोन अपक्ष आमदार आणि एक बसपा आमदाराचे समर्थन मिळाले, तर त्यांची संख्या 107 होते. यानंतरही बहुमतासाठी 5 आमदारांची त्यांना गरज भासणार आहे. ती पूर्ण करणे सोपे नाही. 

 

सत्तेचे गणित असे

222 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी 107 सदस्यांची गरज. भाजपकडे 104 सदस्य. काँग्रेस व जेडीएसचे मिळून 13 आमदार गैरहजर राहिले, तर बहुमताचा आकडा होईल 104.

 

इंग्लंटन रिसॉर्टमध्ये 120 आलिशान खोल्या बुक
राज्यपालांसमोर आमदारांची परेड झाल्यानंतर काँग्रेस व जेडीएसने आपले आमदार दूर रिसॉर्ट आणि हॉटेलात पाठवले असल्याचीही चर्चा होती. भाजप नेते या आमदारांशी संपर्क साधू शकणार नाहीत अशी संपूर्ण दक्षता घेतली जात होती. सूत्रांनुसार, काँग्रेसने इग्लटन रिसॉर्टमध्ये या सर्व आमदारांना ठेवण्यासाठी तब्बल 120 खोल्या बुक केल्या होत्या. तर, जेडीएसचे आमदार हॉटेल शांग्रिलामध्ये प्रवेश करत असल्याचे काही जणांनी पाहिले होते, अशी माहिती समोर येत आहे.

 

काँग्रेसचे 12, जेडीएसचे 2 आमदार गायब; पाठिंब्याच्या पत्रावर स्वाक्षऱ्या
दरम्यान, बुधवारी भाजप, जेडीएस आणि काँग्रेसने आपापल्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला जेडीएसचे राजा वेंटप्पा नायक, वेंकटराव नडगौडा उपस्थिती नव्हते. काँग्रेसचे 78 पैकी 66 आमदाराच बैठकीला उपस्थित होते. काही भागातून आमदारांना बैठकीत आणण्यासाठी काँग्रेसने हेलिकॉप्टरही पाठवले होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कर्नाटक इलेक्शनचे महत्त्वाचे इन्फोग्राफिक्स...   

बातम्या आणखी आहेत...