आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणुकीतील पराभवानंतर योगी सरकार आणि पक्ष संघटनेत बेबनाव, मंत्रिमंडळ आणि संघटनेत फेरबदलाचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघ, पोटनिवडणुकीत भाजपने गमावल्यानंतर राज्य सरकार आणि संघटना यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन वेळा भाजप अध्यक्षांची भेट घेतली. शनिवारी पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि महत्त्वाची बैठक झाली. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने भास्करला सांगितले, की लवकरच संघटनेत आणि सरकारमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. 

 

सत्ता आणि संघटनेत मतभेद 


1) उपमुख्यमंत्र्यांच्या फाइल मुख्यमंत्र्यांनी रोखल्या
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य शनिवारी अचानक दिल्लीत दाखल झाले. सूत्रांनी सांगितले, की गेल्या चार महिन्यांपासून केशव प्रसाद मौर्य यांच्या खात्याचा फाइल मुख्यमंत्री कार्यालयात धुळ खात पडून आहेत. 
- 7 एप्रिल रोजी अलाहाबादमधील एका कार्यक्रमात योगी आदित्यानाथ आणि केशव प्रसाद मौर्य हे दोघेही निमंत्रित होते. उपमुख्यमंत्री मौर्य कार्यक्रमाला आले नाही. 
- योगी आणि मौर्य यांच्यात सर्वकाही आलबेल नाही, हेच या दोन्ही उदाहरणांवरुन दिसून येत आहे. 

 

2) यूपी प्रभारी ओ.पी. माथूरही नाराज 
- भाजपचे यूपी प्रभारी ओ.पी. माथूर हे देखील कार्यकारिणीच्या बैठकीला हजर राहात नाही. त्यांनी यूपी प्रभारी पद सोडण्याची इच्छा भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडे व्यक्त केली आहे. 

 

3) दिनेश शर्मा यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी 
- दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त करण्यात आली. ते त्यांच्या विभागाचे काम व्यवस्थित पाहात नाही, आणि त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करत नसल्याचा ठपका बैठकीत ठेवण्यात आला. 

 

4) मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ फेरबदल टाळला 
- 19 मार्च 2018 रोजी योगी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी स्वत: मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला. 
- योगी सरकारच्या निर्णयावरुन रोज नवा वाद निर्माण होत आहे. ही किरकिरी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री काही अनुभवी चेहऱ्यांना मंत्रिमंडळात घेऊ इच्छित आहेत. या महिन्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीनंतर हा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

 

5) प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह 
- केशव प्रसाद मौर्य राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपने चंदौली येथील खासदार महेंद्र नाथ पांडे यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी  दिली. यामागे जातिय समीकरण असल्याचे म्हटले गेले होते. 
- नवे प्रदेशाध्यक्ष पांडे हे कार्यकर्त्यांना वेळ देत नसल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ते प्रदेशाध्यक्ष असतानाच भाजपला गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य वापर करुन घेतला नाही, असा आरोप होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...