आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Youth Commit Suicide Live On Facebook As He Crosses Max Age Limit To Appear For Army Exams

FB Live करत तरुणाची आत्महत्या, 2700 लोकांनी पाहिले, मात्र पोलिस, कुटुंबाला कळवले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरा - येथील मुन्ना कुमार नावाच्या तरुणाने लष्करात भरती होण्याच्या प्रयत्नात यश न आल्याने, बुधवारी सकाळी गळफास घेत आत्महत्या केली. विशेष म्हणजे त्याने या आत्महत्येचे लाइव्ह स्ट्रीमिंग फेसबूकवर केले. तब्बल 37 मिनिटे हे लाइव्ह सुरू होते. जवळपास 2700 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला पण पोलिस किंवा कुटुंबीयांना कोणीही कळवले नाही. 


बुधवारी पहाटे मुन्ना याने आधी फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर करून स्वतः आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. लष्करात भरती होण्याच्या प्रयत्नात वारंवार अपयशी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले होते. त्यानंतर त्याने फेसबूकवर लाइव्ह करत फाशी घेत आत्महत्या केली. जवळपास 2700 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला, पण कोणीही पोलिसांत किंवा कुटुंबायांना कळवले नसल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. आत्महत्येपूर्वी मुन्नाने 6 पानी सुसाइड नोटही लिहून ठेवले होते. 


5 वेळा दिली परीक्षा 
मुन्नाच्या भावाने सांगितले की, तो वयाच्या 17 व्या वर्षापासून लष्करात जाण्यासाठी अभ्यास करत होता. त्याने पाच वेळा परीक्षा देऊन प्रयत्नही केला. पण त्याला यश आले नाही, त्यामुळे तो नैराश्यात होता. त्याच्या वडिलांनी त्याला यातून बाहेर काढण्यासाठी एक दुकानही टाकून दिले होते. पण त्याने स्वतःला संपवल्याने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...