आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Youth Attacking Friends Who Did Not Help Him Elope With His Girlfriend In Panipat

GF पळवण्यात मदत केली नाही: एका मित्राला केले शूट, दुसऱ्याची जिम जाळली अन् तिसऱ्याला धमकी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोळीबारात जखमी झालेला मित्र राजन - Divya Marathi
गोळीबारात जखमी झालेला मित्र राजन

पानीपत - येथील रॉकी नावाच्या एका युवकाने गुंडगिरीचा कळस गाठला आहे. एकानंतर एक आपल्याच मित्रांना शोधून तो त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करत आहे. यात आरोपी रॉकीने एका मित्राला गोळ्या घातल्या. दुसऱ्याच्या जिमला आग लावली आणि तिसऱ्या मित्राला आता तुझा नंबर असल्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉकीने एका तरुणीला पळवले होते. यानंतर त्या तरुणीच्या भावाने पोलिसांत तक्रार केली. तरुणीच्या भावाला ज्या-ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांना तो शोधून जीवघेणे हल्ले करत आहे. यात प्रामुख्याने त्याच्याच मित्रांचा समावेश आहे. आरोपीने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर तरुणीच्या भावासह 4 जणांची हिटलिस्ट जाहीर केली आहे. 


पोलिसांवरच आरोप...
- शहरातील कलंदर चौक परिसरात राहणाऱ्या एका युवकाने सांगितल्याप्रमाणे, 15 मे रोजी रॉकी शर्मा नावाचा युवक त्याच्या 22 वर्षीय बहिणीला घेऊन पसार झाला होता. यानंतर त्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली. 
- त्या तरुणीचा भाऊ आणि रॉकी जवळच्याच एका जिममध्ये सोबत जात होते. येथील मालक महेंद्र कुमार त्या दोघांचाही मित्र आहे. 
- भावाने लावलेल्या आरोपानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून तो आपल्या मित्रांसह पोलिस स्टेशनच्या चकरा मारत आहे. त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल करताना रॉकीचे व्हॉट्सअॅप स्टेटस सुद्धा दाखवले. परंतु, पोलिसांनी काहीही केले नाही. 
- जिम मालक महेंद्र तरुणीच्या भावाची मदत करत असल्याचे कळाल्यानंतर 4 जुलै रोजी रॉकीने त्याच्या जिमला आग लावली. सोबतच दुसरा एक ड्रायव्हर मित्राच्या छातीत गोळ्या घातल्या. 


फोन करून सांगितले...
- जिम मालक महेंद्र कुमारने सांगितल्याप्रमाणे, त्याच्या जिमला आग लागल्यानंतर एक फोन आला होता. तो रॉकीचा फोन होता. रॉकीने आपणच जिमला आग लावल्याची कबुली दिली. यानंतर जेव्हा दुसरा मित्र राजनने फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजनला तू स्वतःची काळजी घे अशी धमकी दिली. 
- 11 जुलै रोजी (बुधवारी) संध्याकाळी राजन आणि महेंद्र बाइकवरून जात असताना अचानक रॉकी आणि इतर काही लोक समोर येऊन धडकले. त्यानंतर राजनला शूट करून घटनास्थळावरून पसार झाले. गोळी राजनच्या गळ्यात लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. 


तिसऱ्याला धमकी, ब्लॅकमेल
- गोपाल नावाच्या तिसऱ्या मित्राने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, त्याने आरोपी रॉकीसोबत एक कॉस्मेटिकचे दुकान उघडले होते. आता रॉकी याच दुकानावर येऊन 2 लाख रुपयांची मागणी करत आहे. गोपालने सुद्धा त्या तरुणीच्या भावाची साथ दिली होती. 
- यानंतर गोपालने पोलिस स्टेशन गाठले तेव्हा राजनवर हल्ला झाल्याचे कळाले. त्याचवेळी रॉकीने पुन्हा गोपालला फोन लावला. तसेच पुढचा नंबर तुझा आहे अशी धमकी दिली. पोलिसांनी त्यावर सुद्धा दुर्लक्ष केले असा आरोप लावण्यात आला आहे. यानंतर त्याच नंबरवर गोपालने फोन लावला तेव्हा रॉकीने अनोळखी व्यक्तीचे फोन घेऊन कॉल केला असे समोर आले. 
- यानंतर आरोपीने व्हॉट्सअॅप स्टेटसवर हल्ला केल्यानंतर त्या व्यक्तींचे फोटो लाल क्रॉसने रंगवले. तसेच पीडित युवकांची थट्टा देखील उडवली.


पोलिस काय म्हणाले...
पोलिसांनी पीडित युवकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. उलट आपण बेपत्ता झालेल्या 37 तरुणी आतापर्यंत परत आणल्या आहेत. अशात रॉकीले पकडणे काही कठिण नाही. युवक खोटे बोलून पोलिसांना बदनाम करत आहेत असे पोलिसांनी म्हटले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...