आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • धक्कादायक: 72 तास जमिनीखाली जिवंत राहण्याचा दावा, चमत्कार पाहायला झाली लोकांची तोबा गर्दी Youth Cries Die Of Suffocation While Showing Feat In Sriganganagar At Ganeshgarh

72 तास जमिनीखाली जिवंत राहण्याचा दावा, चमत्कार पाहायला झाली लोकांची तोबा गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगंगानगर - जिल्ह्यातील लालगड परिसरात चित्तथरारक कसरती दाखवणाऱ्या काही कसरतपटूंनी आपल्या साथीदाराला एका पोत्यात बंद करून 5 ते 6 फूट खोल खड्ड्यात टाकले. त्यांनी दावा केला की, जमिनीच्या आत त्यांचा साथीदार 72 तास जिवंत राहू शकतो. दुसऱ्या दिवशी हा चमत्कार पाहायला लोकांची भलीमोठी गर्दी जमली. परंतु चमत्काराच्या खोट्या दाव्यामुळे तरुणाचा श्वास गुदमरून मृत्यू झालेला होता. 

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- या घटनेबद्दल माहिती मिळाल्यावर स्थानिकांनी पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. घटनेच्या आधी मृत तरुणाचे साथीदार सर्व सामान गुंडाळून तेथून फरार झाले होते. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
- पोलिस म्हणाले, गणेशगड गावात बुधवारी काही भटक्या कलाकारांची टोळी खेळ दाखवण्यासाठी आली होती. कसरती दाखवत कलाकारांनी 5 ते 7 फूट खोल खड्डा खोदला.
- गावकऱ्यांसमोरच आपल्या 25 वर्षीय एका साथीदाराला  पोत्यात बंद करून त्या खड्ड्यात फेकले.  तेव्हा कलाकारांनी आपला साथीदार जमिनीखाली 72 तास जिवंत राहू शकत असल्याचा दावा केला होता. खड्ड्यात टाकल्यावर त्यांनी वरून माती टाकून खड्डा पुन्हा भरला होता. 

 

असा झाला तरुणाच्या मृत्यूचा खुलासा
- सूत्रांनुसार, गुरुवारी सकाळी गावकरी परत खेळ दाखवलेल्या जागी चमत्कार पाहण्यासाठी गोळा झाले. तेथून सर्व कलाकार मंडळी गायब होती. त्यांनी खड्डा पाहिला तेव्हा तेथून माती हटलेली आढळली. तेथे काहीही नजरेस आले नाही. हे पाहून जमलेले सर्व हादरले. तेथून काही अंतरावरच आणखी एका खड्ड्यात पोते दिसले.  उघडून पाहिल्यावर त्यात त्या तरुणाचा मृतदेह आढळला. हे पाहताच गावकऱ्यांना धक्का बसला, त्यांनी लगेच पोलिसांना माहिती कळवली.

 

ना मृताची ओळख पटली, ना साथीदारांचा सुगावा
- लालगडचे पोलिस स्टेशन इंचार्ज तेजवंत सिंह म्हणाले, मृताची ओळख अजून पटलेली नाही. त्याच्या साथीदारांचीही माहिती मिळालेली नाही. पोलिस गुन्हा दाखल करून अशा करतब दाखवणाऱ्या टोळ्यांची माहिती गोळा करत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...