आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरदेवाने ठोकरला 11 लाखांचा हुंडा, म्हणाला- तुमची मुलगीच सर्वात मोठी संपत्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेखावटी - राजस्थानच्या 3 जिल्ह्यांत 3 अनोखे लग्नसोहळे पाहायला मिळाले. एकीकडे शेखावटीमध्ये राजपूत समाजातील एका तरुणाने टिळ्याची 11 लाख रुपयांची रक्कम घ्यायला नकार दिला. दुसरीकडे सीकरमध्ये एक नवरदेव साध्या ड्रेसवरच आपल्या नवरीला फक्त 17 मिनिटांत फेरे घेऊन निघूनही गेला. याच महिन्यात नागौरे जिल्ह्यातून आलेल्या एका वऱ्हाडात नवरदेवाने 5 लाखांचा हुंडा घ्यायला नकार दिला होता.

 

तुमची मुलगीच आहे माझी संपत्ती...
मंगळवारी बड़ाऊमध्ये नागौरच्या डेगाना तालुक्यातील पालियास येथील रहिवासी रेवत सिंह यांचा सुपुत्र सुरेंद्र सिंहला त्याचे सासरे उम्मेद सिंह हे मुलगी अंशु कंवरच्या लग्नासाठी टिळ्याचा शगुन म्हणून 11 लाख रुपये देऊ लागले तेव्हा नवरदेवाने हात जोडून नकार दिला. नातेवाइकांच्या म्हणण्यावर शगुन म्हणून फक्त 11 रुपये घेतले, तेही त्याला घ्यायचे नव्हते.

या कुटुंबातील पुष्पेंद्र सिंह राठोड म्हणाले की, सुरेंद्र सिंह रेल्वेत असिस्टंट लोको पायलट आहेत. त्यांचे लग्न बडाऊच्या उम्मदे सिंह यांची मुलगी अंशु कंवरशी मंगळवारी झाले. नवरदेवाने हात जोडून सर्वांना हुंड्यासारख्या कुप्रथेला नष्ट करण्याचे आवाहन केले.

 

पुढे वाचा.. फक्त 17 मिनिटांत कसे लागले लग्न...

बातम्या आणखी आहेत...