आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणीच्या प्रकरणातून कापले युवकाचे कान, हाताचे बोटे; असे आहे संपूर्ण प्रकरण....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाल.... - Divya Marathi
विशाल....

जालंधर- येथे एका तरूणीच्या वादावरून तरूणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विशाल स्टुडिओचा मालकाला दोन तरूणांनी अपहरण करून त्याचे कान आणि बोटे कापून जखमी अवस्थेत रायपूर बल्ला गावात फेकून निघून गेले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विशाल कुमारचे वय 27 वर्ष असून तो जालंधर येथील रहिवाशी आहे. त्याने सांगितले की, नंदपूर रोडवर त्याचा स्टुडिओ आहे. बुधवारी रात्री 8 वाजता स्टूडिओ बंद करून विशाल घरी जाण्यासाठी निघाला होता. तेव्हा गुलाबदेवी रोडवर एक कार त्याच्यासमोर येऊन थांबली आणि गाडीत बसलेल आरोपी तसविंदरने मित्रांसोबत मिळून त्याचे अपहरण केले.


यानंतर ते त्याला पठानकोट रोडवरील रायपूर बल्ला गावात घेऊन गेले. तेथे त्याच्या उजव्या हाताचे बोट, अंगठा आणि कान कापले, नंतर डोक्यावर रॉड मारून त्या जखमी अवस्थेत तेथेच फेकून निघून गेले. या दरम्याने तेथील लोकांनी त्याला जखमी अवस्थेत पाहून अॅम्बुलन्सला फोन केला आणि त्याचा व्हिडिओ देखील बनवला.


डीएसीप सरवजीत राय यांनी या घटनेविषयी बोलताना म्हटले आहे की, या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. हे प्रकरण एका तरूणीशी संबंधीत असल्याचेही राय यांनी सांगितले.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...