आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचा मृतदेह घेण्यासाठी 450 Km. दुर आला 13 वर्षाचा चिमुकला, पोलिसांनी केली मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इलाहाबाद (उत्तर प्रदेश)- बिहारच्या भागलपूर येथील एक 13 वर्षाचा मुलगा रविवारी आपल्या आईचा मृतदेह घेण्यासाठी इलाहाबाद येथे पोहोचला. मृत महिला बिहारहून येथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी आली होती, तीन दिवसांपूर्वी ती ट्रेन अपघातात जखमी झाली होती. तिचा मोठा मुलगा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करून निघून गेला. त्याचा आद्याप पत्ता लागला नाही. त्यानंतर पोलीस अधिकारी मोहन सिंह आणि एका समाजसेवी संस्थेच्या मदतीने 13 वर्षाचा छोटा मुलगा आपल्या आईजवळ पोहोचला.


ट्रेनमधून पडून जखमी झाली होती महिला...
- रुपेशने सांगितले, विडिल भोपाळमध्ये रिक्षा चालवतात, माझी आई मधू(38) मोठा भाऊ राजीव(15)सोबत भाजी विकाण्याचे काम करते. यातूनच आमचा घरखर्च चालतो. आई आठवड्यातून दोन दिवास इलाहाबादच्या मुण्डेरा मार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी येत होती.
- येथून भाजीपाला खरेदी केल्यानंतर तो बिहारमध्ये विकण्यात येतो. 20 डिसेंबरला आई ट्रेनमधून पडून जखमी झाली होती.


हॉस्पिटलमध्ये दाखल करून निघून गेला मुलगा...
- मोठा भाऊ राजीव आईला एसआरएन हॉस्पिटलमध्ये दाखल करून कुठेतरी निघून गेला. मोबाईल आणि पैसे देखील तो आपल्यासोबत घेऊन गेला.
- पोलिस अधिकारी मोहन सिंह यांनी सांगितले की, गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे नव्हते. लोकांनी वरगणीकरून 6 हजार 4 शे रुपये जमा केले, याच पैशातून त्यांना अँबुलन्समधून घरी पाठवण्यात आले. मुलासोबत त्याचे मामा सुधीर देखील पोस्टमार्टम हाऊसला आले होते.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...