आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांदा(उत्तर प्रदेश)- येथे पाच वर्षाच्या मुलीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. आरोपी हा पीडित मुलीचा काका असल्याचे सांगण्यात येत आहे. चिमुकलीला फिरवण्याचा बहाण्याने आरोपी बाहेर घेऊन गेला आणि तिच्यावर दुष्कर्म केले. त्यानंतर रक्तभंबाळ अवस्थेत तिला तलावाच्या काठावर सोडून फरार झाला. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
असे आहे संपूर्ण प्रकरण...
- सदर घटना शहरातील नावाब टॅँक रोडवरील आहे. येथे राहणारी पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत संध्याकाळी तिच्या दुकानात बसलेली होती.
- तिथे महिलेच्या नात्यातील दिर ओमप्रकाश वर्मा (28) पोहोचला. पीडितेच्या आईने सांगितले की, काही वेळ तिथेच बसून होता, नंतर त्याने जेवण मागितले. परंतु, मी त्याला नकार दिला.
- मी दुकानात ग्राहक पाहत होते, तेवढ्यात तो मुलीला उचलून घेऊन गेला. माझी नजर गेली तेव्हा मुलगी गायब होती.
- त्यानंतर मुलीचा शोध सुरू केला, तेव्हा तलावाच्या काठावर मुलगी रक्तभंबाळ अवस्थेत आढळून आली. विचारपूस केल्यानंतर तिने सांगितले की, काकाने माझ्यासोबत दुष्कर्म केले आहे.
- पोलिस अधिकारी राघवेंद्र सिंह यांनी सांगितले की, घटनेची तक्रार दाखल झाली आहे. पॉक्सो अॅक्ट अंतर्गत केस नोंदवण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
काय आहे पॉक्सो अॅक्ट?
- प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल अफेंसेस अॅक्ट 2012 (पॉक्सो अॅक्ट) अंतर्गत अल्पवयीन मुलांसोबत होणारे लैंगिक आत्याचार आणि छेडछाड प्रकरणी कार्यवाही करण्यात येते.
- हा अॅक्ट मुलांना सेक्सुअल हॅरेसमेंट, सेक्शुअल असॉल्ट आणि पोर्नोग्राफीसारख्या गंभीर गुन्ह्यांपासून सुरक्षा प्रदान करतो.
- पॉक्सो अॅक्टची कलम 6 अंतर्गत हे सर्व प्रकरण घेण्यात येतात. यामध्ये दहा वर्षापासून जन्मठेप होऊ शकते, तसेच दंड देखिल ठोठावण्यात येऊ शकतो.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.