आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळात्या चितेवरून ओढला बहिणीचा मृतदेह, 3 भावांनी मिळून केले होते असे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कविताचा मृतदेह जळत्या चित्यावरून ओढल्यामुळे एका बहिणीचे बात भाजले होते.. - Divya Marathi
कविताचा मृतदेह जळत्या चित्यावरून ओढल्यामुळे एका बहिणीचे बात भाजले होते..

बागपत- बडौत परिसरात तीन भावांनी मिळून आधी आपल्याच बहिणीची हत्या केली आणि नंतर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तेथे दुसऱ्या बहिणी पोहोचल्या आणि त्यांनी या प्रकराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन डेडबॉडी ताब्या घेऊन पोस्टामार्टमासाठी पाठवली. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

जमीनीवरून होत होता वाद...
कविता नावाची मुलगी आपल्या आई आणि भावांसोबत बडौली रोडवरील कॉलनीत राहत होती. तिच्या दुसऱ्या बहिणींनी आरोप केला आहे की, तीन भावांनी मिळून आधी कविताला विष पाजले. तिचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी तिचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नेला. या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो आणि जळत्या चितेवरून बहिणीचा मृतदेह काढून घेतला. या दरम्यान एका बहिणीचा हात देखील भाजला.


2008 मध्ये झाले होते कविताचे लग्न...
- कविताचे लग्न 2008 मध्ये गाजियाबाद येथील लोनीमध्ये राहणाऱ्या तरूणाशी झाले होते. त्यांना एक मुलगी देखील होती. पतीसोबत वाद झाल्याने कविता आपल्या आईकडे दोन वर्षापासून राहत होती. कविता बीएचे शिक्षण घेत असताना एक खाजगी जॉब देखील करत होती.
- बहिणींनी सांगितले की, तिन्ही भाऊ जमीनीच्या वाट्यासाठी आईसोबत नेहमी भांडण करत होते. कविता आईची बाजू घेऊन नेहमी विरोध करत होती. अनेक वेळा भाऊ कविताकडे पैसे मागत होते, परंतु कविता त्याना नकार देत होती.
- आईची बाजू घेणे आणि भावांसोबत पैशांचा वादच कविताच्या जिवावर बेतला. यामुळेच तिच्या भावांनी तिची हत्या केली.
- बडौत येथील पोलिस अधिक्षक हरेराम सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. जळत्या चितेवरून काढलेला मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. चौकशी सुरू आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...