आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाममध्ये झुंडीकडून मारहाणप्रकरणी 19 जणांना अटक, 13 जणांविरुद्ध अटक वॉरंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी - आसामच्या कारबी अंगलाँग जिल्ह्यातील दोघांना झुंडीने मारहाण करून ठार केल्याप्रकरणी पोलिस कारवाईला वेग आला आहे. राजधानीत या घटनेचा निषेध करण्यासाठी लोकांनी मूक मोर्चा काढला. याप्रकरणी आतापर्यंत १९ जणांना अटक करण्यात आले आहे.

 

पोलिस उपसंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) मुकेश अग्रवाल जातीने याप्रकरणी तपास करत आहेत. १९ जणांशिवाय आणखी १३ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. द्वेषपूर्ण संदेश सोशल मीडियावर टाकल्याने ही घटना घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पानज्युरी गावातील लोकांना सोशल मीडियाद्वारे कळाले की, गावात लहान मुलांचे अपहरण करणारे शिरले आहेत. त्यांनी संशयावरून निलोत्पल दास आणि अभिजित नाथ या दोन पर्यटक तरुणांना ठार केले.


नीलोत्पल दास आणि अभिजित नाथ या दोन मित्रांना झुंडीने मारहाण केली. हे दोघे सहलीसाठी कारबी अंगलाँग येथे गेले होते. पानज्युरी येथे त्यांचे वाहन रात्रीच्या वेळी अडवण्यात आले. गेल्या शुक्रवारपासून ते बेपत्ता होते. ते लहान मुलांचे अपहरण करतात, असा आरोप येथील गावकऱ्यांनी केला. मात्र आपण असे करत नसल्याचे वारंवार या तरुणांनी सांगूनही प्रक्षुब्ध जमावाने त्यांना ठार केले.

बातम्या आणखी आहेत...